AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना दुसर्‍या हप्त्याची प्रतिक्षा होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत केला. तुमचे नाव यादीत चेक कसं करणार?

Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?
कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत
| Updated on: Aug 24, 2026 | 4:34 PM
Share

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी आनंदवार्ता धडकली. शेतकऱ्यांच्या खात्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा हप्ता बँकेत खटाखट जमा झाला. 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत केला. यापूर्वी 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते. दोन्ही मिळून 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सध्या स्पष्ट होत आहे.

दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना लाभ

कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आज 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यांची बँक खाती पूर्णपणे कर्जमुक्त करण्यात आली. निरंक करण्यात आली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा वापर केल्यामुळे कोणत्याही मध्यस्थीशिवाय त्यांच्या खात्यात थेट कर्जमुक्ती साठीची रक्कम जमा करण्यात आली आहे. गरजेच्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

आतापर्यंत 10 हजार 115 कोटींचे वाटप

पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत 12.56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने थेट वितरण प्रणालीने 10 हजार 115 कोटी रुपये जमा केले आहे. अजून मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. अनेक भागात पावसाने डोळे वटारल्याने पेरणीचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर आला आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील खर्चाची तरतूद कशी करावी, कर्जाची तरतूद कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. त्यांनाही लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरीत पात्र शेतकऱ्यांसाठी पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा हक्क

आज शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला हक्क आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी 6 लाख 22 हजार आणि आता 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 10 हजार 115 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यातही सरकार लवकरच पैसे जमा करणार आहे. काही लोक तरुणांच्या खांद्यावर बंदुक ठेवून त्यांच्या पोळ्या शेकत असल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

कर्जमाफी यादीत नावे कसे शोधणार?

सरकारच्या आपले सरकार अथवा संबंधित सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जा

होमपेजवरील लाभार्थी यादी अथवा कर्जमाफी योजना यादी हा पर्याय निवडा

जी माहिती विचारली गेली आहे, ती पूर्ण भरा.

जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, बँकेचे नाव ही माहिती नोंदवा

सबमिट केल्यानंतर तुमच्या गावाची पात्र यादी स्क्रीनवर येईल

या यादीत आता तुमचे नाव शोधा

अनेक गावात आणि बँकेतही कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांची यादी अपडेट होत आहेत.

कर्जमाफी यादीत यावेळी नाव आले नसले तरी ते पुढील टप्प्यात येण्याची शक्यता आहे

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु