AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dope Test: विनेश फोगाटवर कारवाईचा बडगा, यशस्वी जयस्वालसारखी चूक केल्याने थेट बंदी

Vinesh Phogat: भारतीय कुस्ती महासंघाने वरिष्ठ महिला कुस्तीपटू विनेश फोगाटविरूद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे. अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याने काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नॅशनल ओपन रँकिग कुस्ती स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

Dope Test: विनेश फोगाटवर कारवाईचा बडगा, यशस्वी जयस्वालसारखी चूक केल्याने थेट बंदी
Dope Test: विनेश फोगाट कारवाईचा बडगा, यशस्वी जयस्वालसारखी चूक केल्याने थेट बंदीImage Credit source: PTI
| Updated on: May 09, 2026 | 4:39 PM
Share

कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या काही वर्षात या ना त्या कारणामुळे चर्चेत आहेत. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वनजी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी 100 ग्रॅम वजन अधिक असल्याने अपात्र ठरली होती. त्यानंतर तिने तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकला होता. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये राजकीय प्रवास सुरू केला. पण डिसेंबर 205 मध्ये कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा 2028 ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू केली. पण आता विनेश फोगाट वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याने तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे कुस्ती महासंघाने तिला 26 जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे. गोंडामध्ये नॅशनल ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेत भाग घेणार होती. मात्र आता तिला तसं करता येणार नाही. जवळपास 18 महिन्यांनी कुस्तीत पुनरागमन करताना तिला धक्का बसला आहे.

विनेश फोगाटवर कारवाईल

भारतीय कुस्ती महासंघाने या कृतीची गंभीर दखल घेतली असून 15 पानांची नोटीस विनेश फोगाटला पाठवली आहे. महासंघाच्या मते, तिच्या कृतीमुळे देशाच्या छबीला नुकसाना पोहोचलं आहे आणि भारतीय कुस्तीचं नुकसान झालं आहे. यात डब्ल्यूएफआय संविधान, युनाईटेड वर्ल्ड रेसलिंगच्या आंतरराष्ट्रीय नियम आणि अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे. कुस्ती महासंघाने चारही आरोपांप्रकरणी तिच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. यात 2024 पॅरिस ऑलिम्पिक वजन कमी करण्यात आलेल्या अपयशामुळे अयोग्यता, अँटी डोपिंग नियमांतर्गत ठिकाण सांगण्यात अपयश आणि मार्च 2024 मध्ये आयोजित निवड प्रक्रियेत दोन वेगवेगळ्या वजनी गटात स्पर्धा करण्याचं प्रकरण सहभागी आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केलं की, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या एथलीट्सासठी युडब्ल्यूडब्ल्यू अँटी डोपिंग नियमांतर्गत सहा महिन्यांच्या नोटीस अवधी पूर्ण न केल्याने विनेश देशांतर्गत स्पर्धेत कोणताही स्पर्धा खेळू शकणार नाही. या बंदीमुळे 10 ते 12 मे पर्यंत गोंडा येथे होणाऱ्या नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धेत तिला भाग घेता येणार नाही. ही स्पर्धा तिच्यासाठी खूपच महत्त्वाची होती. कारण निवृत्ती मागे घेतल्यानंतर ही कमबॅक स्पर्धा असल्याचं बोललं जात होतं. विनेश फोगाटला या नोटीशीचं उत्तर 14 दिवसांच्या आत देणं भाग आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा