नॅशनल स्केटिंग स्पर्धेत झळकले टीम एक्स्ट्रीमचे तारे

पुण्यात 13वी नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नवी मुंबईतील टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

नॅशनल स्केटिंग स्पर्धेत झळकले टीम एक्स्ट्रीमचे तारे
नॅशनल स्केटिंग स्पर्धेत झळकले टीम एक्स्ट्रीमचे तारे
| Updated on: Jan 17, 2026 | 10:55 PM

पुण्यात सुरू असलेल्या RGOI अर्थात रुलर गेम ऑफ इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या नॅशनल रोलर स्केटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी करत पहिल्या दिवशी तब्बल 6 पदकांवर आपले नाव कोरले. पुणे येथील एलएक्सटी राहुल राणे स्केटिंग बॅण्ड ट्रॅकवर 17 आणि 18 जानेवारी 2026 रोजी 13वी नॅशनल रोलर स्केटींग चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहे.या स्पर्धेत अनन्या माळी (2 रौप्यपदक) स्वरूप सोनवणे (1 रौप्य आणि 1 कांस्यपदक) आणि पृथ्वी भावना राजेश (2 कांस्यपदक) यांनी उल्लेखनीय कामागिरी केली. प्रत्येकाने महाराष्ट्रासाठी दुहेरी पथकांची कमाई केली आहे.

करण सरदार यांनी या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. करण सरदार हे स्वतः राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये टीम एक्स्ट्रीम या क्लब मध्ये 100 पेक्षा अधिक खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये स्केटिंग या खेळामध्ये अधिकाधिक खेळाडू देण्याचा या टीम एक्स्ट्रीम क्लबचा मानस आहे.