शोएब मलिकशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झा सक्रीय, एक्स पार्टनरसोबत पार्टीत जल्लोष

Sania Mirza Rohan Bopanna news : घटस्फोटानंतर सानिया मिर्झा आपले आयुष्य नव्याने जगण्यास सुरुवात केली आहे. टेनिसमधील आपला जुना जोडीदार रोहन बोपन्ना यांच्यासोबत एका पार्टीत सानिया मिर्झा दिसून आली. सानियाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

शोएब मलिकशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झा सक्रीय, एक्स पार्टनरसोबत पार्टीत जल्लोष
Sania Mirza and Rohan Bopanna
| Updated on: Feb 15, 2024 | 8:33 AM

नवी दिल्ली, दि. 11 फेब्रुवारी 2024 | भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासोबत असलेला संसार मोडला आहे. त्यांचा घटस्फोट झाला आहे. शोएब मलिक याने सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाह केल्यानंतर सानियाने (Sania Mirza) त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या घटस्फोटाची चर्चा अजूनही सुरु आहे. परंतु हा सर्व प्रकार विसरून सानिया मिर्झा सक्रीय झाली आहे. तिने आपले आयुष्य नव्याने जगण्यास सुरुवात केली आहे. टेनिसमधील आपला जुना जोडीदार रोहन बोपन्ना (Rohan Bopanna)यांच्यासोबत एका पार्टीत सानिया मिर्झा दिसून आली. सानिया मिर्झा हिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रोहन बोपन्नासोबत जल्लोष

सानिया मिर्झा हिने पार्टीत रोहन बोपन्नासोबत जल्लोष केला. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सानिया पार्टीत आली होती. रोहन बोपन्ना याने नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी रोहन बोपन्ना याने पार्टी दिली होती. त्या पार्टीत सानिया मिर्झा आली होती. सानिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिचे आगमन होताच तिचे अनेक फोटो काढण्यात आले.

सानिया कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी पोहोचली तेव्हा पॅप्सने तिला फोटो काढण्याची जागा सांगण्यास सुरुवात केली. त्याचे म्हणणे ऐकून सानियाही तिथे उभी राहिली. मात्र, यानंतर त्यांनी पॅप्सकडेही तक्रार केली. सानिया म्हणाली, ‘किती सूचना देता तुम्ही लोक?’ असं म्हणत ती स्वतःच हसायला लागली.

2010 साली शोएब मलिक झाले होते लग्न

2010 साली शोएब मलिक याच्यासोबत सानिया मिर्झा हिचे लग्न झाले होते. शोएबचे हे दुसरे लग्न होते. 2002 मध्ये शोएब आणि आयशा यांचे लग्न झाले होते. तसेच आयशा सिद्दीकीने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. एप्रिल 2010 मध्ये पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता सानियासोबतही शोएबचा घटस्फोट झाला आहे.