B Sai Praneeth Retirement | वर्ल्ड चॅम्पियनशीप मेडल विनर बी साई प्रणीतचा बॅडमिंटनला अलविदा

| Updated on: Mar 04, 2024 | 10:09 PM

B Sai Praneeth Retirement | स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. प्रणीतने भारतासाठी त्याच्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

B Sai Praneeth Retirement | वर्ल्ड चॅम्पियनशीप मेडल विनर बी साई प्रणीतचा बॅडमिंटनला अलविदा
Follow us on

मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत यांनी आपल्या चाहत्यांना मोठा झटका दिला आहे. बी साई प्रणीत याने वयाच्या 31 वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बी साई प्रणीत याने अनेक स्पर्धांमध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामिगरी केली. तसेच बी साई प्रणीत याने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत इतिहास रचला होता. बी साई प्रणीत याने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. बी साई याने भारतासाठी प्रकाश पादुकोण यांच्यानंतर 36 वर्षांनी कांस्य पदक मिळवलं होतं.

बी साईची लांबलचक सोशल मीडिया पोस्ट

बी साई प्रणीतने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीली आहे. साईने या पोस्टमध्ये आपल्या कारकीर्दीतील अनेक अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. तसेच बी साईने आपल्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शकांचे, प्रशिक्षकांचे जाहीर आभारही मानले आहेत. बी साईची ही इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बी साई प्रणीत याने 2008 मध्ये पहिल्यांदा आपली छाप सोडली. प्रणीतने कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्ये मेन्स डबलमध्ये कांस्य पदक पटाकवलं. त्यानंतर 2 वर्षांनी 2010 साली वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिनशीप एकेरीमध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर प्रणीतने 2016 मध्ये सलग 2 मेडल्स पटकावले. प्रणीतने या वर्षी कारकीर्दीतील एकमेव सुवर्ण पदकही पटकावलं. प्रणीतने भारतात झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सांघिक खेळात गोल्ड मडेलची कमाई केली. तर एशियन टीम चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. तर 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ मेडल जिंकत इतिहास रचला.

साई प्रणितने आपली घोडदौड अशीच सुरु ठेवली. प्रणतिने 2020 मध्ये कांस्य पदक पटकावलं. प्रणितने ही कामगिरी एशियन टीम चॅम्पियनशीप स्पर्धेत केली. मात्र त्यानंतर साईला फार काही विशेष करता आलं नाही.

अर्जून पुरस्काराने सन्मानित

बी साई प्रणीत याच्यासाठी 2019 हे वर्ष अविस्मरणीय ठरलं. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाची कमाई केल्याने त्याला अर्जून पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.