पाकिस्तानचा हा गोलंदाज Virat Kohli याच्या प्रेमात, हटके शुभेच्छा दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा

आशिया चषकापासून विराट कोहलीचा फॉर्म चांगला सुरु आहे.

पाकिस्तानचा हा गोलंदाज Virat Kohli याच्या प्रेमात, हटके शुभेच्छा दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा
virat kohli happy birthday
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 05, 2022 | 8:24 AM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा आज 34 वा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस कालपासून सोशल मीडियावर (Social Media) साजरा केला जात आहे. अनेक दिग्गजांनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराट कोहलीली ट्विटवर टॅग करीत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आशिया चषकापासून विराट कोहलीचा फॉर्म चांगला सुरु आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यांच्या विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये विराट कोहलीने चांगली कामगिरी केली होती. तसेच सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत विराटने चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने 220 धावा काढल्या आहेत.

शहनवाज दहानी हा पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज आहे. त्याने मी शनिवारपर्यंत वाट नाही पाहू शकत. तसेच विराट कोहली सोबत ट्विटरवर एक फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “विराट कोहलीने क्रिकेटला चांगले दिवस आणले आहेत, अशा व्यक्तीला शुभेच्छा द्यायला मी शनिवारची वाट पाहणार नाही.” अशा हटके शुभेच्छा दिल्याने शहनवाज दहानीची चर्चा सोशल मीडियावर अधिक आहे.