सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार? मुक्ताईनगरमध्ये मोठी सभा होणार

सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे.

सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार? मुक्ताईनगरमध्ये मोठी सभा होणार
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 10:52 PM

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण मांडून आहेत. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा जळगावात ठिकठिकाणी फिरत आहे. ही प्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगर येथे पोहोचली तेव्हा पोलिसांनी सुषमा यांच्या सभेला परवानगी नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुषमा अंधारे यांची सभा असलेल्या परिसरात महाआरतीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं असल्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारली. त्यानंतर बराच राजकीय गदारोळ झाला. अखेर सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये खुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल, असं जिल्हा संपर्कप्रमुखांनी जाहीर केलंय.

सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे. शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय.

मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेवरून जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा पवित्रा घेऊनही पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैदेत ठेवलं.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सुषमा अंधारे यांना आज मुक्ताईनगरकडे जाण्यास रोखलं. त्यामुळे मुक्ताईनगरची महाप्रबोधन सभा होऊ शकली नाही. त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये आता उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतलाय.

उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख लवकरच घोषित करण्यात येणार, अशी माहिती संजय सावंत यांनी दिली.

सुषमा अंधारे आता परळीला रवाना

सुषमा अंधारे गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सभा घेऊन गुलाबराव पाटील, किशोर आप्पा पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या दोन दिवसात जळगावत मोठा राजकीय राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या या दौऱ्यानंतर सुषमा आता बीड जिल्ह्यातील परळीच्या दिशेला रवाना झाल्या आहेत.

मुक्ताईनगरची सभा रद्द झाल्याने झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारे जळगाव वरून परळीकडे रवाना झाल्या आहेत. जळगाव येथील हॉटेल केपी प्राइड येथून सुषमा अंधारे यांचा ताफा परळीकडे रवाना झाला.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत व फुलांचा वर्षाव करत सुषमा अंधारे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला.

‘जे काम करायला आले होते ते फत्ते’

“जे काम मी करायला आले होते ते काम मी फत्ते केले. काही लोक जिंकूनही हरतात. तर काही लोक हरलेली बाजी देखील जिंकतात. सत्तेचा गैरवापर करत दंडपशाही व दादागिरी करत मुक्ताईनगरची सभा रद्द केली. मात्र तरुणांनी फेसबुक पेजवरून सभा घराघरात पोहोचवली”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

गुलाबराव पाटलांवर आधीच गद्दारीचा शिक्का बसला आहे. मात्र आता जी काही थोडीफार होती ती घालवली. तीन महिन्याच्या बाळाला गुलाबराव पाटील इतके घाबरतील असं मला वाटलं नव्हतं. गुलाबराव पाटलांनी आज जो प्रकार केला तो निश्चितपणे जळगावकरांना आवडला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी जळगाव सोडताना दिली.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.