Kainat Imtiaz | विराटवर फिदा पाकिस्तानच्या सौंदर्यवती क्रिकेटपटूचा साखरपुडा

| Updated on: Jul 20, 2020 | 6:11 PM

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाजने तिच्या साखरपुड्याची माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

Kainat Imtiaz | विराटवर फिदा पाकिस्तानच्या सौंदर्यवती क्रिकेटपटूचा साखरपुडा
Follow us on

इस्लामाबाद : जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेली पाकिस्तानची स्टार खेळाडू कायनात इम्तियाजचा (Kainat Imtiaz Announced Her Engagement) साखरपुडा झाला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाजने तिच्या साखरपुड्याची माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 28 वर्षीय कायनातने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. 17 जुलैला कायनताचा साखरपुडा झाला. “अखेर मी होकार दिला”, असं तिने सोशल मीडियावर लिहिलं (Kainat Imtiaz Announced Her Engagement).

कायनात विराटची फॅन

कायनात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीची फॅन आहे. 2018 मध्ये कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधात एक दिवसीय मालिकेत 558 धावा केल्या होत्या. कोहलीची फलंदाजी पाहून कायनात त्याची फॅन झाली आणि तिने सोशल मीडियावर विराटचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर याची चांगलीच चर्चा झाली होती.

कायनात इम्तियाज ही पाकिस्तानच्या त्या महिला खेळाडूंपैकी आहे ज्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर कायनातने तिच्या साखरपुड्याची माहिती देताच तिला अनेक खेळाडूंनी आणि तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कायनातचं 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

कायनात इम्तियाजने आतापर्यंत पाकिस्तानकडून 11 एक दिवसीय आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. गेल्यावर्षी बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेतही ती खेळली होती (Kainat Imtiaz Announced Her Engagement).

कायनात इम्तियाजचा जन्म 21 जून 1992 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला. तिने 2010 मध्ये पॉचेस्थ्रूममध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-20 सामान्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एका वर्षानंतर तिने बांग्लादेशविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटला सुरुवात केली होती. कायनातने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 आणि टी-20 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या.

क्रिकेटमध्ये चांगला अनुभव असूनही कायनात इम्तियाजला पाकिस्तान संघात नेहमी स्थान मिळालं नाही. यावर्षी टी-20 विश्वचषकच्या संघातही तिला जागा मिळाली नाही. त्यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात मात्र तिला स्थान मिळालं होतं. यावेळी तिने 4 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, पाकिस्तानचा त्या स्पर्धेत सर्व सात सामन्यात पराभव झाला होता.

Kainat Imtiaz Announced Her Engagement

संबंधित बातम्या :

IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली, तारखा जवळपास निश्चित

ENG vs WI : 117 दिवसांनी क्रिकेटपटू मैदानात, ना प्रेक्षक, ना एकमेकांची गळाभेट, नवे नियम काय?