Arshad Nadeem : गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अर्शदला बस्स फक्त इतके लाख, पाकिस्तानी पंतप्रधानांची लाज निघाली

Arshad Nadeem : जॅवलिन थ्रोअर अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन केलं. त्याने भारताच्या नीरज चोप्राला मागे टाकून गोल्ड मेडल जिंकलं. अर्शदच्या या प्रदर्शनानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. अशा प्रकारे आपली फजिती होईल याचा कधी शहबाज शरीफ यांनी विचारही केला नसेल.

Arshad Nadeem : गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अर्शदला बस्स फक्त इतके लाख, पाकिस्तानी पंतप्रधानांची लाज निघाली
Arshad nadeem-sehbaz sharif
Image Credit source: IG NEWS
| Updated on: Aug 09, 2024 | 1:01 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानी जॅवलिन थ्रोअर अर्शद नदीमने थक्क करणारं प्रदर्शन केलं. जॅवलिन थ्रो च्या फायनलमध्ये अर्शदने 92.97 मीटर अंतरावर थ्रो केला. कोणीही अर्शदच्या या थ्रो च्या जवळपास पोहोचू शकलं नाही. अर्शदला गोल्ड मेडल मिळालं. या पदकाने पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील 32 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. पाकिस्तानला याआधी बार्सिलोन ऑलिम्पिकमध्ये 1992 साली हॉकीमध्ये शेवटच ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. अर्शद नदीमच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुभेच्छा देताना एक फोटो शेयर केला. त्यासाठी शरीफ मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. या फोटोमध्ये शहबाज शरीफ अर्शदला 10 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे 3 लाख भारतीय रुपये) देताना दिसतायत.

शुभेच्छा देऊनही अशा प्रकारे आपली फजिती होईल याचा विचारही शहबाज शरीफ यांनी केला नसेल. पाकिस्तानी फॅन्सनी या फोटोवरुन शहबाज शरीफ यांना बरच काही सुनावलं. क्रेडिट चोरण्याचा आरोप केला. असा फोटो शेअर केल्याबद्दल शहबाज शरीफ यांना लाज वाटली पाहिजे असं पाकिस्तानी युजर्सनी सुनावलं. मे 2024 चा हा फोटो आहे. अर्शद नदीम सध्या पॅरिसमध्ये आहे. म्हणजे ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्याला फक्त 3 लाख रुपये दिले. गोल्ड मेडल विजेत्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या सिंध सरकारने अर्शदसाठी पुरस्काराची घोषणा केली आहे.

सिंध सरकारने अर्शदला काय इनाम जाहीर केलं?

पाकिस्तानच्या केंद्र सरकारने भले अर्शद नदीमकडे लक्ष दिलं नसेल. फक्त 3 लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता दिली. सिंध सरकारने आता अर्शद नदीमला 5 कोटी पाकिस्तानी रुपयाच (म्हणजे भारतीय रुपयात 1.5 कोटी) इनाम जाहीर केलं आहे.

पाकिस्तानला शेवटच गोल्ड मेडल कधी मिळालेलं?

अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फक्त पाकिस्तानची मेडलची प्रतिक्षाच संपवली नाही, तर गोल्ड मेडल जिंकून अनेक रेकॉर्ड नावावर केले. त्याने 92.97 मीटर थ्रो सह 16 वर्ष जुना ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला. पाकिस्तानसाठी व्यक्तीगत स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. अर्शदने आशियातील रेकॉर्डही मोडला. हा रेकॉर्ड आधी तैवानच्या चाओ त्सुन चेंगच्या नावावर होता. त्याने 91.36 मीटर लांब थ्रो केला होता. त्याने ऑक्टोबर 1993 मध्ये हा रेकॉर्ड केलेला. 31 वर्षानंतर अर्शद नदीमने हा रेकॉर्ड मोडला. पाकिस्तानने याआधी 1984 साली ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.