
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. सध्या भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. याचा परिणाम क्रिकेटच्या मैदानातही दिसून येतोय. दोन्ही देशातील खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. भारत-पाकिस्तानला एका ग्रुपमध्ये ठेऊ नका, अशी BCCI कडून ICC ला पत्र पाठवून विनंती केली जाऊ शकते. या दरम्यान पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारताविरोधात गरळ ओकली आहे. यावर्षी भारतात महिला वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत खेळण्यास आपल्याला अजिबात रस नाही, असं गुल फिरोजाने म्हटलं आहे.
गुल फिरोजा महिला वर्ल्ड कप क्वालिफायर दरम्यान पाकिस्तानी टीमचा भाग होती. ती टीममध्ये ओपनरच्या भूमिकेत होती. अलीकडेच पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली. “आम्ही भारतात खेळत नाहीय. आम्हाला भारतात खेळण्याची इच्छा नाहीय. पण इतकं आम्हाला माहित आहे की, आम्ही आशियाई कंडिशन्समध्ये खेळणार आहोत. श्रीलंका किंवा दुबई कुठेही सामने झाले, तरी तिथली स्थिती आशिया सारखी असेल अशी अपेक्षा आहे. आमचे क्वालिफायरचे सामने मायदेशात होते. त्या हिशोबानेच पीच बनवण्यात आला होता. जिथे कुठे वर्ल्ड कपचे सामने होतील, तिथली परिस्थिती देशांतर्गत मैदानासारखीच असेल. आमची तयारी तशीच असेल आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत” असं गुल फिरोजा म्हणाली.
“We’re not going to India.”
Pakistan opener Gull Feroza firmly states that the team won’t play in India.
🎙️ Catch the full post-qualification chat with Gull and others:
https://t.co/8HjU8lTI0R pic.twitter.com/ZqRGxHRbtx— PakPassion.net (@PakPassion) April 24, 2025
BCCI सर्व आदेश मानणार
BCCI ने स्पष्ट केलय की, ते भारत सरकारच्या सूचनांच पालन करतील. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अलीकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. आम्ही पीडितांसोबत आहोत. सरकार जे सांगेल, ते आम्ही ऐकू असं ते म्हणालेले. सध्याच्या धोरणानुसार टीम इंडिया पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाही. पुढेही हेच धोरण कायम राहिलं. पण ICC टुर्नामेंटमध्ये भारतीय टीम पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळते.