AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चा

लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये दृश्यमानता कमी असल्याने नाणेफेकीचा कौल लांबला. यावेळी मैदानात अष्टपैलू हार्दिक पांड्या मास्क घालून खेळताना दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. असं असताना प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चा
लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चाImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 17, 2025 | 8:58 PM
Share

India vs South Africa, 4th T20I: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील निर्णायक सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजयेपी इकाना स्टेडियममध्ये होत आहे. पण हा सामना काही वेळेत सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा वेळ वारंवार पुढे ढकलण्यात आली. आता हा सामना होणार की नाही याबाबत शंका आहे. कारण मैदानाती दृश्यमानता खूपच कमी आहे. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करताना त्रासाला सामोरं जावं लागू शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल वारंवार लांबवला जात आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर हा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. असं असताना मैदानात हार्दिक पांड्या मास्क घालून उतरला होता. लखनौला असलेल्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे मास्क घालून उतरल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर लखनौचं प्रदूषण 400च्या पार असल्याचा दावाही केला जात आहे. इतकं प्रदूषण असणं आरोग्यासाठी घातक आहे. कारण हा स्तर अत्यंत हानिकारक आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याने काही काळ मास्क घातलं होतं. पण त्यानंतर विना मास्क मैदानात उतरला. तसेच इतर खेळाडूही मास्कशिवाय मैदानात उतरले. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी मास्क घातले नव्हते. हवामान वेबसाईटनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता लखनौचा AQI क्षमतेपेक्षा जास्त होता. लखनौ टी20 सामन्यासाठी टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. पण तसं झालं नाही. दर अर्ध्या तासांनी पंचांकडून तपासणी केली जात आहे. आता रात्री 9 वाजता पुन्हा एकदा मैदानाचा आणि दृष्यमानतेचा अंदाज घेतला जाईल.

धुकं आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टी क्रिकेटसाठी भविष्यात मारक ठरू शकतात. कारण बहुतांश वनडे आणि टी20 सामने रात्री उशिरापर्यंत चालतात. अशा स्थितीत धुकं आणि प्रदूषणाची अशी स्थिती राहिली तर दिल्ली, लखनौ आणि चंदीगडमध्ये अर्थात उत्तर भारतात सामन्यांचं आयोजन करणं कठीण जाईल. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे. जर अशी स्थिती राहिली तर जगभरात नाचक्की होईल. 2023 त्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दिल्लीत झालेल्या बांग्लादेश श्रीलंका सामन्यापूर्वीही असाच प्रश्न उपस्थित झाला होता.दोन्ही संघांनी सराव सत्र रद्द केलं होतं. 2017 मध्ये श्रीलंकेचा संघाने दिल्ली कसोटी दरम्यान मास्क घातलं होतं.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.