BAN vs PAK : फॉलो-थ्रू मध्ये कॅच पकडताना पाकिस्तानी बॉलर पीचवर इतक्या जोरात आपटला की, स्ट्रेचरवरुन..VIDEO
BAN vs PAK : बांग्लादेशच्या इनिंगमध्ये आठवी ओव्हर सुरु असताना पहिल्यांदा गोलंदाजीत बदल करण्यात आला. खुर्रम शहजादच्या जागी हसन अलीच्या हातात चेंडू सोपवला. याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर हसन अली सोबत दुर्घटना घडली.

बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज शनिवार 16 मे पासून सुरु झाला आहे. मॅच सुरु झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच एक पाकिस्तानी गोलंदाजासोबत दुर्घटना घडली. त्यामुळे स्ट्रेचरवरुन त्याला मैदानाबाहेर आणावं लागलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली जखमी झाला. इनिंगमध्ये तो आपली पहिलीच ओव्हर टाकत होता. काही वेळ त्याला स्टेडियमच्या मेडिकल रुममध्ये पाकिस्तानी टीम फिजियोच्या देखरेखीलखाली ठेवण्यात आलं होतं. सिलहटमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पाकिस्तानी टीमने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने टीमला चांगली सुरुवात दिली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये बांग्लादेशी ओपनर महमुदुल हसन जॉयला आऊट केलं. त्यानंतर डेब्यु करणारा दुसरा ओपनर तंजीद हसन आणि मॉमिनुल हकने डाव सावरला. पाकिस्तानला लगेच दुसरा विकेट घेऊ दिला नाही.
बांग्लादेशच्या इनिंगमध्ये आठवी ओव्हर सुरु असताना पहिल्यांदा गोलंदाजीत बदल करण्यात आला. खुर्रम शहजादच्या जागी हसन अलीच्या हातात चेंडू सोपवला. याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर हसन अली सोबत दुर्घटना घडली. तंजीदने स्ट्रेट फटका मारला. हसनी अलीने फॉलो-थ्रू मध्ये चेंडू पकडण्यासाठी डाइव्ह मारली. पण त्यात तो फसला. तोंडावर पडला. त्याचं डोकं जमिनीवर जोरात आदळलं.
लगचे स्ट्रेचर मागवण्यात आलं
हसन अलीला ही कठीण कॅच पकडता आली नाही. तो वेदनेने विव्हळत होता. अशावेळी लगेच पाकिस्तानी टीमचा फिजियो धावत पळत मैदानात आला. त्याने हसन अलीला तपासलं. थोड्यावेळानंतर हसन अली उठून उभा राहिला. त्यावेळी त्याला त्रास जाणवत होता. लगचे स्ट्रेचर मागवण्यात आलं. त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.
The moment when Hasan Ali got injured.
Prayers for him, May Allah bless him with
Speedy recovery ❤️🩹 pic.twitter.com/hr54yEAZ0e— Amir (@Khanu_3) May 16, 2026
शेवटचा चेंडू कोणी टाकला?
हसन अलीचा ओव्हरमधील शेवटचा चेंडू सलमान अली आगाने टाकला. हसन बराच वेळ मेडिकल रुममध्ये होता. यावेळी फिजियो त्याच्यासोबत होते. चांगली बाब म्हणजे त्याला काही गंभीर दुखापत झाली नाही. काहीवेळ आराम केला. हलके उपचार घेतल्यानंतर तंदुरुस्त होऊन हसन अली पुन्हा मैदानात परतला. पुन्हा काहीवेळात त्याने गोलंदाजी सुरु केली.