Palash Muchhal : पलाशने थेट अंडरवर्ल्डची दिली धमकी, स्मृतीच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र विज्ञान माने याने पलाश मुच्छल विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पलाशने त्याच्यावर मानहानीचा दावा केला. आता विज्ञानने पलाशने त्याला जिवेमारण्याची धमकी दिल्याचे सांगितले आहे.

Palash Muchhal : पलाशने थेट अंडरवर्ल्डची दिली धमकी, स्मृतीच्या मित्राचा धक्कादायक खुलासा
Smriti Mandhana
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 26, 2026 | 11:41 AM

गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे चांगलेच चर्चेत आहे. स्मृतीचे संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न होणार होते. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी स्मृतीने नकार दिला. त्यानंतर पलाश मुच्छलवल अनेक मुलींनी फसवणूक केल्याचे आरोप केले. आता, स्मृतीच्या बालपणीच्या मित्राने पलाशवर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पलाशने स्मृतीच्या मित्रावर 10 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. त्यासोबतच त्याने खळबळजनक आरोप केले आहेत.

संगीतकार पलाश मुछल विरोधात स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याच्याकडून तक्रार केल्यानंतर,पलाश मुच्छल कडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आपली बदनामी केल्याचा आरोप करत पलाश मुच्छल कडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.दरम्यान आपल्या पाठवण्यात आलेले नोटीस माझे वकील रोहित पाटील यांच्याकडून नोटीसला उत्तर देणार असल्याचा स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान मानेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अंडरवर्ल्डकडून धमकी

तसेच, पलाश मुच्छल कडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. त्यासोबतच अंडरवर्ल्डचीही धमकी पलाश मुछलकडून देण्यात येत असल्याचा आरोप देखील विज्ञान माने याने केला आहे. चित्रपटातील आर्थिक फसवणूक प्रकरणी न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहणार आहे. मात्र पलाश मुछल कडून जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावं,अशी मागणी देखील विज्ञान माने केली आहे.

पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांनी नजरीया या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. विज्ञान माने याने या चित्रपटासाठी पलाशला पैसे दिले. मात्र, स्मृती मानधनाशी लग्न मोडल्यानंतर पलाशने विज्ञानला रिप्लाय देणे बंद केले. तसेच त्याचे पैसे परत करण्यासदेखील नकार दिला. पलाशने विज्ञानला ब्लॉक केले. त्यानंतर विज्ञानने पोलिसात धाव घेतली आणि सर्व पुरावे जमा केले. आता पलाश यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.