Smriti Mandhana : जिथे वर्ल्डकप जिंकला, तिथेच घातली मागणी.. पलाश-स्मृती मंधानाच्या प्रपोजलचे गोड क्षण समोर !

भारतीय महिला संघाटी उपकर्णधार आणि स्टार क्रिकेटर स्मृती मंधानाचा उद्या शाही थाटात विवाह होणार आहे. सांगलीची लेक आता इंदौरची सून होणार आहे. तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने तिला स्पेशल अंदाजात प्रपोज केले, तेही अशा ठिकाणी जी स्मृतीसाठी खूप खास आहे. त्यांच्या प्रपोजलचा गोड व्हिडीओ समोर आला आहे.

Smriti Mandhana : जिथे वर्ल्डकप जिंकला, तिथेच घातली मागणी.. पलाश-स्मृती मंधानाच्या प्रपोजलचे गोड क्षण समोर !
पलाशचं स्मृतीला खास अंदाजात प्रपोजल
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 22, 2025 | 12:46 PM

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal)  लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला सांगलीत त्यांचा विवाह पार पडणार असून त्याआधीच्या अनेक फंक्शन्सचे, सेलिब्रेशनचे व्हिडीओ समोर येत आहे. भारतीय संघातील इतर महिला खेळाडूंनीही स्मृतीच्या आयुष्यातील या खास प्रसंगी हजेरी लावली असून तिचे सर्वांसोबतचे हळदीचे फोटोही व्हायरल झालेत. दरम्यान स्मृती आणि पलाशचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, तो म्हणजे त्यांच्या प्रपोजलचा. पलाशने स्मृतीला डीवाय पाटील स्टेडियममध्ये प्रपोज केले, हे तेच स्टेडियम आहे, जिथे या महिन्याच्या सुरूवातील भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या खास जागी पलाशने स्मृतीला प्रपोझ केलं, त्यांच्या या गोड क्षणांना व्हिडीओतही कॅप्चर करण्यात आलं आहे. स्मृती आणि पलाश सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि यापूर्वीह त्यांनी एकमेकांसोबतचे अनेक पोटो, खास क्षण शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट

खरंतर हे प्रपोजल सहा दिवसांपूर्वी झालं, पण त्यांनी हा व्हिडीओ नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. 2025 च्या महिला विश्वचषकात स्मृती मंधानाने उत्कृष्ट कामगिरी केली. विजयानंतर पलाश मुच्छलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, त्याच्या हातावरील टॅटूमध्ये “SM18” हे शब्द स्पष्टपणे दिसत होते. “SM” म्हणजे स्मृती मंधाना आणि “18” हा नंबर म्हणजे तिच्या वाढदिवसाची तारीख आणि तिचा जर्सी क्रमांकही आहे.

 

कोण आहे पलाश मुच्छल ?

पलाश मुच्छल हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक आहे. तो संगीत दिग्दर्शक देखील आहे. प्रसिद्ध गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पलक मुच्छल हिचा तो भाऊ आहे. 2014 साली शिल्पा शेट्टी हिच्या “ढिश्कियाँ” या चित्रपटातून संगीतकार म्हणून पलाशने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने “भूतनाथ रिटर्न्स” सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले.

बराच काळ रिलेशनशिपमध्ये

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची प्रेमकहाणी 2019 मध्ये सुरू झाली. आता जवळजवळ सहा वर्षांनंतर हे जोडपे उद्या, 23 नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. पलाशचा जन्म 30 नोव्हेंबर 1992 साली झाला. अगदी कमी वयातच त्याने संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकलं असून अल्पावधीत त्याने यश मिळवलं.