Sarabjyot Singh: मुलाने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकले, आई म्हणते, आता बिझी आहे, नंतर बोलू…

Paris Olympics bronze medalist Sarabjot Singh:आईला मुलावर पूर्ण विश्वास होता. मुलगा पदक जिंकले ही खात्री होतीच. तो पदक जिंकण्याचे आश्वासन देऊन निघाला होता. आणखी एक जण म्हणतो, सरबज्योत सिंग ''गजब हैं आप और आपकी बेबे!''

Sarabjyot Singh: मुलाने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकले, आई म्हणते, आता बिझी आहे, नंतर बोलू...
Sarabjyot Singh
| Updated on: Aug 01, 2024 | 4:59 PM

Paris Olympics bronze medalist Sarabjot Singh: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनु भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी भारताला दुसरे मोठे यश मिळवून दिले. हरियाणामधील अंबाला जिल्ह्यातील सरबज्योत सिंग याने मनु भाकरसोबत 10 मीटर पिस्तूल प्रकारात कास्य पदक पटकवले. त्यांनी कोरियाच्या खेळाडूंचा 16-10 असा पराभव केला. पदक मिळल्याचा आनंद सरबज्योत सिंग याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. हा आनंद आपल्या परिवारासोबत साजरा करण्यासाठी त्याने आईला फोन केला. त्याने आई हरदीप कौर यांना जेव्हा फोन लावला, तेव्हा तिने जे सांगितले, त्यानंतर हसू येईल.

सरबज्योत सिंग याच्या आईने फोन उचलला. त्याला त्यांनी सांगितले, की “मी आता बिझी आहे, नंतर बोलते.” आईचे हे उत्तर ऐकल्यावर सरबज्योतसिंग यालाही हसू आले. स्वत: सरबज्योत सिंग याने हा किस्सा सांगितला. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यावर अनेक कॉमेंट येत आहेत.

सोशल मीडियावर अनेक कॉमेंट

मनु भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने भारताला दुसरे पदक मिळवून दिले. 10 मीटर मिश्र दुहेरीत त्यांनी कांस्य पदक जिंकून दिले. भारताला मिळालेले हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी मनु भाकर हिने वैयक्तीक पदक मिळवले होते. या यशानंतर सरबज्योत सिंग याची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याच्या मुलाखतीत आईसोबत घडलेला किस्सा सांगितला. त्यावर एक युजर म्हणतो, भारतात असेही होते. दुसरा युजर म्हणतो, आईला मुलावर पूर्ण विश्वास होता. मुलगा पदक जिंकले ही खात्री होतीच. तो पदक जिंकण्याचे आश्वासन देऊन निघाला होता. आणखी एक जण म्हणतो, सरबज्योत सिंग ”गजब हैं आप और आपकी बेबे!”

ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सरबज्योत सिंग याचे गाव धीनमधील लोकांना त्याचा गर्व वाटत आहे. सरबज्योतने गावाची कीर्ती सर्वत्र नेली. तो ज्या ठिकाणीही खेळण्यास गेला रिकाम्या हाताने परत आला नाही. ऑलिम्पिकमध्येही त्याने निराश केले नाही. त्याची आई हरदीप कौर म्हणते, सरबज्योतला गरमा गरम जेवण आवडते. तो परतल्यावर त्याच्यासाठी गरम जेवणच बनवणार आहे.