World Athletics Championship 2022: ‘हा विशेष क्षण’, पंतप्रधान मोदींकडून नीरज चोप्रासाठी खास टि्वट

| Updated on: Jul 24, 2022 | 10:50 AM

भारताचा अव्वल क्रीडापटू नीरज चोप्राने अमेरिकेच्या भूमीवर कमाल केली आहे. त्याचा प्रभाव पूर्ण भारतात दिसतोय. भारतातील राजकीय क्षेत्रही याला अपवाद नाहीय.

World Athletics Championship 2022: हा विशेष क्षण, पंतप्रधान मोदींकडून नीरज चोप्रासाठी खास टि्वट
Follow us on

मुंबई: भारताचा अव्वल क्रीडापटू नीरज चोप्राने अमेरिकेच्या भूमीवर कमाल केली आहे. त्याचा प्रभाव पूर्ण भारतात दिसतोय. भारतातील राजकीय क्षेत्रही याला अपवाद नाहीय. भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकीत (javelin throw) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी सकाळी वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championship) स्पर्धेत नीरजने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. चौथ्या प्रयत्नात नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत केलेल्या थ्रो ने त्याला रौप्यपदक मिळवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच नेते मंडळी नीरज चोप्राच कौतुक करतायत. त्याला शुभेच्छा देत आहेत.

क्रीडा क्षेत्रासाठी खास क्षण

“आमच्या सुप्रसिद्ध क्रीडापटूने पुन्हा एकदा आपलं कर्तुत्व सिद्ध केलय. नीरज चोप्रा तुला शुभेच्छा” असं मोदींनी आपल्या टि्वट मध्ये म्हटलं आहे. “वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक विजेती कामगिरी हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खास क्षण आहे. आगामी स्पर्धांसाठी नीरजला शुभेच्छा” असं मोदींनी त्यांच्या टि्वट मध्ये म्हटलं आहे.

पिछाडीवरुन नीरजचं कमबॅक

नीरजने 88.13 मीटर अंतरावर भालाफेकून रौप्यपदक निश्चित केलं. याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 2003 साली अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत कास्य पदक विजेती कामगिरी केली होती. या महत्त्वाच्या स्पर्धेत नीरजने फाऊलने सुरुवात केली होती. पण दुसऱ्याप्रयत्नात त्याने 82.39 मीटर अंतरावर भालाफेकून कमबॅक केलं. तिसऱ्या प्रयत्नात 86.37 आणि चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर अंतरावर थ्रो करुन रौप्यपदक निश्चित केलं.