Harbhajan Singh : पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजन सिंगचा गंभीर आरोप

पंजाब क्रिकेट असोसिएशनवरती सद्या त्याने गंभीर आरोप केले आहेत. त्याची चर्चा सोशल मीडियावर अधिक आहे.

Harbhajan Singh : पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजन सिंगचा गंभीर आरोप
हरभजन सिंग
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 08, 2022 | 10:39 AM

टीम इंडियाचा (Team India) फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने आत्तापर्यंत अनेक गोष्टीचे आरोप केले आहेत. तसेच तो अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मांडत असतो. पंजाब क्रिकेट असोसिएशनवरती सद्या त्याने गंभीर आरोप केले आहेत. त्याची चर्चा सोशल मीडियावर अधिक आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे काही अधिकारी बेकायदेशीर कामात गुंतले आहेत. हरभजनने असा आरोप पंजाब क्रिकेट असोसिएशनवर केला आहे. विशेष म्हणजे तसं पत्र त्याने संबंधित विभागाला दिल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

हरभजनने पंजाबचे मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांना देखील पत्र लिहिले आहे.

बीसीसीआयला न जुमानता काही निर्णय अधिकारी घेत असल्याने हरभजन सिंग संतापला आहे. अधिकारी आपल्या वैयक्तिक कार्यालयात काही बैठका घेत आहेत.