राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, जाणून घ्या प्रत्येक अपडेट
Local Body Election : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूका काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता यासाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. 2 डिसेंबरला नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूका काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरसह 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालावर असणार आहे.
उद्या मतदान, 21 तारखेला निकाल
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. मात्र 23 ठिकाणची निवडणूक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या ठिकाणी उद्या म्हणजेत 20 डिंसेबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये मतदान होणार?
उद्या म्हणजेच 21 तारखेला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटण येथेही मतदान पार पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, नांदेडमधील मुखेड, धर्माबाद, लातूरमधील निलंगा, रेणापूर, हिंगोलीतील वसमत, अमरावतीतील अंजनगावसूर्जी, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, यवतमाळमधील यवतमाळ, वाशिममधील वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, वर्ध्यातील देवळी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे मतदान पार पडणार आहे.
सर्व पक्षांचा जोरात प्रचार
राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान अधिकारी मतदान केंद्रावर पोहचण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. सर्वच मोठे नेते प्रचारात सहभागी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
