
असं म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठी घडतं. पण आशिया कपमध्ये सिलेक्शननंतर रिंकू सिंहसोबत UP T20 League मध्ये जे झालं, त्याला अजिबात चांगलं मानता येणार नाही. रिंकू UP T20 League 2025 लीगच्या ओपनिंग मॅचमध्ये खेळला होता. पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. सीजनच्या दुसऱ्या मॅचमध्ये त्याला आपल्या बॅटची पावर दाखवण्याची संधी मिळाली. पण एक 20 वर्षाचा मुलगा त्याच्यावर भारी पडला. त्याच्या मार्गात काटा बनला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात रिंकूला फसवलं. रिंकूला फसवून त्याला बोल्ड करणाऱ्या 20 वर्षाच्या मुलाच नाव आहे, पर्व सिंह.
यूपी T20 लीग 2025 मध्ये 19 ऑगस्ट रोजी रिंकू सिंहच्या नेतृत्वाखाली मेरठची टीम सीजनचा दुसरा सामना खेळत होती. त्यांचा सामना लखनऊ फाल्कंस विरुद्ध होता. या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेरठ मॅवरिक्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 150 रन्स केल्या. याच इनिंगमध्ये मेरठचा कॅप्टन रिंकू सिंहसोबत जे झालं, त्याकडे सगळ्यांच लक्ष वेधलं गेलं. आशिया कप टीम निवड झाल्यानंतर रिंकू सिंह पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला. त्याच्याकडून धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा होती. पण बिलकुल त्याच्या उलट झालं.
रिंकुच खराब प्रदर्शन
रिंकू सिंहला ना वेगवान खेळ दाखवता आला, ना त्याने सिक्स मारली. शेवटी 20 वर्षाच्या पर्व सिंहच्या फिरकीच्या जाळ्यात फसून तो क्लीन बोल्ड झाला. त्याचं हे खराब प्रदर्शन टीमच्या पराभवाच कारण ठरलं. रिंकू सिंहने 19 चेंडूत 121.05 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यात एकही सिक्स नाहीय. त्याने 19 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानंतर पर्व सिंहच्या फिरकीच्या जाळ्यात गुंतत गेला.
आशिया कपआधी शंकेची पाल चुकचुकतेय
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिंकू सिंहच्या फॅन्सना सुद्धा कसा धक्का बसला, ज्यावेळी त्यांनी आपल्या स्टार खेळाडूला पर्व सिंहच्या फिरकीवर आऊट होताना पाहिलं. UAE च्या खेळपट्टया स्पिन फ्रेंडली असणार आहेत. तिथेच आशिया कप होणार आहे. रिंकू ज्या पद्धतीने यूपी T20 लीगमध्ये स्पिन गोलंदाजी खेळला, यावरुन फॅन्सची मनात आशिया कपआधी शंकेची पाल चुकचुकत आहे.
रिंकूच्या टीमवर आरामात मिळवला विजय
मॅच बद्दल बोलायच झाल्यास रिंकू सिंहच्या टीमने 151 धावांच टार्गेट लखनऊ फाल्कंससमोर ठेवलं होतं. त्यांनी ते टार्गेट 8 चेंडू आणि 5 विकेट राखून पार केलं. दोन सामन्यातील रिंकू सिंहच्या टीमचा हा पहिला पराभव आहे.