Rishabh Pant : अरेरे हा तर ऋषभ पंत… उर्वशी रौतेलाच्या हॉटेलच्या खुलाशावर चाहत्यांचा अंदाज, व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लक केल्याची चर्चा

Rishabh Pant  : उर्वशी रौतेलानं सांगितलंय, ती हॉटेलच्या खोलीत झोपली होती. जेव्हा तिला जाग आली तेव्हा लॉबीमध्ये थांबलेल्या आरपीने तिला 16-17 वेळा कॉल केला होता. यावर नेटिझन्सनं ट्रोल केलंय.

Rishabh Pant : अरेरे हा तर ऋषभ पंत... उर्वशी रौतेलाच्या हॉटेलच्या खुलाशावर चाहत्यांचा अंदाज, व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लक केल्याची चर्चा
उर्वशी रौतेला
Image Credit source: social
| Updated on: Aug 11, 2022 | 6:54 AM

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलीवूडचं नातं खूप जुनं आहे. विराट कोहली- अनुष्का शर्मा, युवराज सिंग – हेजल कीज, झहीर खान – सागरिका घाटगे या जोडींची नावं नेहमी चर्चेत असतात. यावरुन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या चर्चाही रंगतात. एकेकाळी भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांचीही नावं खूप जोडली गेली होती. 2018 मध्ये दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. मात्र, यानंतर पंतने उर्वशीला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्याचीही अफवा पसरली होती. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आरपीबद्दल बोलताना दिसली होती. या व्हिडीओवर चाहते म्हणतात की आरपी म्हणजे ऋषभ पंत. नुकतीच तिनं एक मुलाखत दिली. ज्यामध्ये तिनं हॉटेलमध्ये कोणीतरी तिची वाट पाहत असताना तिला झोप लागल्याच्या घटनेबद्दल चर्चा केली. अभिनेत्रीनं सांगितले की, मी वाराणसीमध्ये शूटिंग करत होते. यानंतर मी दिल्लीत एक शो केला. म्हणून मी फ्लाइट घेतली. मी दिवसभर शूटिंग केले. याचवेळी एक घटना घडली’ याच घटनेची सध्या चर्चा आहे.

हा व्हिडीओ पाहा

 

नेमकं काय झालं?

अभिनेत्री उर्वशी एका मुलाखतीत म्हणाली की, 10 तासांच्या शूटिंगनंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा मी तयारीला लागलो. उर्वशी म्हणाली की मिस्टर आरपी आले आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत बसले. ती म्हणाली की खूप थकल्यामुळे मला झोप लागली होती आणि आरपीने खूप कॉल केले हे मला अजिबात माहित नव्हते. उर्वशीच्या या खुलाशानंतर चाहत्यांनी आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. तो म्हणाला हा पंत आहे.

नाव देण्यास नकार दिला

आरपी म्हणजे ऋषभ पंत असे चाहते म्हणतात . त्याच वेळी, अभिनेत्रीने असा आरोप केला आहे की मीडिया आणि पापाराझींनी त्यांचे नाते खराब केले. आरपी यांना विचारले असता त्यांनी नाव घेण्यास नकार दिला. ती म्हणाली की जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिले की 16-17 वर मिस कॉल आला होता आणि मला वाईट वाटले की कोणीतरी माझ्यामुळे वाट पाहत आहे आणि मी जाऊ शकत नाही. यानंतर मी त्याला म्हणाले की तू मुंबईला येशील तेव्हा तिथे भेटू. यावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे.