IND vs AUS: सगळ्यात वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज ठरला ऋषभ पंत

| Updated on: Jan 19, 2021 | 2:04 PM

विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे.

IND vs AUS: सगळ्यात वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज ठरला ऋषभ पंत
Follow us on

ब्रिस्बेन : भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतनं मंगळवारी चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. इतकंच नाही तर आतापर्यंत 1000 धावा पूर्ण करणारा वेगवान विकेटकीपर असा इतिहास ऋषभ पंतनं रचला आहे. पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. (rishabh pant becomes fastest wicketkeeper to score 1000 runs in ind vs aus team india win )

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या लिस्टमध्ये आणखी एक विक्रम नोंदवला आहे. जबरदस्त फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतने ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात 58.3 षटकांत दोन धावा घेत कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने माजी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचा विक्रमही मोडला आहे.

यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 23 वर्षीय पंतने 27 डावांचा खेळ केला. याआधी हा विक्रम माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. त्याने 32 कसोटी डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. पण पंतने हा विक्रम मोडत आपल्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. पंतने भारताकडून 16 एकदिवसीय आणि 28 टी -20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 374 आणि 210 धावा केल्या आहेत.

एकूणच बोलायचं झालं तर सगळ्यात वेगवान 1000 कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डीकॉकच्या नावावर आहे. त्याने फक्त 21 डावात हे कामगिरी केली होती. यामध्ये पहिल्या पाचमध्ये भारतातून कोणाचंही नाव नाहीये.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. हा विजय ऐतिहासिक आहे, असे सचिन तेंडुलकर याने ट्विट करुन म्हटले (rishabh pant becomes fastest wicketkeeper to score 1000 runs in ind vs aus team india win )

संबंधित बातम्या – 

Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

PHOTO | कांगारुंना लोळवलं, टीम इंडियाच्या धडाकेबाज विजयाचे फोटो

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(rishabh pant becomes fastest wicketkeeper to score 1000 runs in ind vs aus team india win )