PHOTO | कांगारुंना लोळवलं, टीम इंडियाच्या धडाकेबाज विजयाचे फोटो

अ‍ॅडिलेड सामन्यात पराभूत झाल्यावर भारतीय संघाने मेलबर्नमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि मालिकेतबरोबरी साधली. त्यानंतर सिडनी टेस्ट अनिर्णीत राहिल्यावर अखेरीस संघाने ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:49 PM, 19 Jan 2021
1/8
अ‍ॅडिलेड सामन्यात पराभूत झाल्यावर भारतीय संघाने मेलबर्नमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि मालिकेतबरोबरी साधली. त्यानंतर सिडनी टेस्ट अनिर्णीत राहिल्यावर अखेरीस संघाने ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.
2/8
रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला.
3/8
या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे.
4/8
फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका लागल्याने पुजारा मैदानात कोसळला होता.
5/8
तर, रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत महत्त्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.
6/8
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 108 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने 50 धावा केल्या.
7/8
टीम इंडियाकडून पहिल्या डावात थंगारासू नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंजर या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एका फलंदाजाला माघारी धाडलं.
8/8
वॉशिंग्टन सुंजर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि रिषभ पंत संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.