IND vs NZ: घाणेरडी ॲक्शन हवी असेल तर जयस्वाल आहे ना…भर सामन्यात पंत असं का म्हणाला? Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं

IND vs NZ Test Series: भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो शुभमन गिलला सामना सुरु असताना सल्ला देताना दिसत आहे.

IND vs NZ: घाणेरडी ॲक्शन हवी असेल तर जयस्वाल आहे ना...भर सामन्यात पंत असं का म्हणाला? Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं
rishabh pant
Image Credit source: google
| Updated on: Nov 22, 2026 | 1:16 PM

IND vs NZ Test: भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत केवळ आपल्या बॅटनेच नव्हे, तर क्षेत्ररक्षण करतानाही भरपूर मनोरंजन करण्यासाठी ओळखला जातो. यष्टीमागे बसून त्याच्या मिश्किल टिप्पण्या ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतने अनेक मनोरंजक टिप्पण्या केल्या.

वेलिंग्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, ऋषभ पंत यष्टीमागे खूप मजा-मस्ती करताना दिसला. त्याने कर्णधार शुभमन गिलला विविध सल्ले दिले. आधी तो म्हणाला, “जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करू दे… ते सर्वोत्तम ठरेल.” मग, गंमतीने तो म्हणाला, “मी लेग स्पिन गोलंदाजी करू शकतो.”

Loading...

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात २ गडी गमावून ११९ धावा केल्या होत्या. भारत अजूनही २३३ धावांनी आघाडीवर आहे आणि सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. १२८ धावांची शानदार खेळी केल्यानंतर, ऋषभ पंत क्षेत्ररक्षण करताना अगदी निवांत दिसत होता. यष्टीमागे विनोद करून त्याने भारतीय गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावून ठेवले.

चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये, शुभमन गिलने विकेट्सच्या शोधात काहीतरी वेगळा प्रयोग केला. त्याने देवदत्त पडिक्कलला एक षटक दिले. त्याचवेळी, ऋषभ पंतने त्याला आणखी काही सल्ला दिला. ऋषभ पंत कर्णधाराला म्हणाला, “तू जस्सी भाईला (बुमराह) गोलंदाजी करू दे, देवला (देवदत्त) सोडून दे. तुझ्याकडे जास्त पर्याय नाहीत. मी लेग स्पिन गोलंदाजी करू शकतो. जर काही घाणेरडी ॲक्शन हवी असेल तुला तर जयस्वाल पण गोलंदाजी करु शकतो.”

वेलिंग्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकांच्या जोरावर किवी संघाने ३६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने पहिल्या डावात ७२० धावा जमवल्या. न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्याच्या एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ही भारताची तिसरी सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंतने शतके झळकावली, तर यशस्वी जैस्वालने ८५,, देवदत्त पडिक्कलने ८० आणि कर्णधार शुभमन गिलने ९८ धावांचे योगदान दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us