
India Wins Champion Trophy : भारतीय फिरकीपटूंची तगडी गोलंदाजी आणि फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण असून सर्वजण सेलिब्रेनशच्या मोडमध्ये आहेत. या विजयाचा आनंद भारतीय संघानेही उत्तम घेतला. या विजायसोबतच क्रिकेटच्या मैदानात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माची दोस्ती आणि अनोखा अंदाजही दिसला. न्युझीलंडला नमवून चॅम्पियन बनल्यानंतर दोघेही भरमैदानात सेलिब्रेशन करताना दिसेल, त्यांचा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
फील्डवरही रो-कोने आखली रणनिती
अनेकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही रोहित आणि विराट अनेकवेळा एकत्र मैदानावर रणनीती बनवताना दिसले. कॅप्टन रोहित शर्माच्या (76 धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. भारताचे हे सलग दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. त्यानंतर संपूर्ण संघ जल्लोष करताना दिसला. त्यावेळी रोहित आणि कोहलीने हातात स्टंप घेतली आणि त्याच्या सहाय्यानेच ते दांडिया खेळले.
virat kohli and rohit sharma playing dandiya after winning champions trophy was not in my 2025 bucket list 😭 pic.twitter.com/dZsRRCU8Mt
— saif (@nightchanges) March 9, 2025
दरम्यान न्युझीलंडतर्फे रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. एकेकाळी अशी वेळ आली होती की किवींचा संघ धावा करण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. अशा परिस्थितीत माजी कर्णधार विराट कोहली कर्णधार रोहितच्या मदतीसाठी पुढे आला.
भारताचा चार गडी राखून विजय
अंतिम सामन्यात 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 49 षटकात 6 विकेट गमावत 254 धावा करत विजय मिळवला. श्रेयस अय्यरने 48 आणि शुभमन गिलने 31 धावा केल्या. अक्षर पटेलने 29 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने नाबाद 34 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 9 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने डॅरिल मिशेल (63 धावा) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सात विकेट्सवर 251 धावा केल्या.