Rohit Sharma: फॅन्ससाठी कायपण! चाहत्यासाठी चक्क बॉडीगार्डशी भिडला रोहित; मुंबई एअरपोर्टवरील Video Viral

रोहित शर्माचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो चाहत्यासाठी रोहित त्याच्या बॉडिगार्डशी भिडलेला पाहायला मिळत आहे.

Rohit Sharma: फॅन्ससाठी कायपण! चाहत्यासाठी चक्क बॉडीगार्डशी भिडला रोहित; मुंबई एअरपोर्टवरील Video Viral
rohit sharma
| Updated on: Jun 22, 2026 | 3:12 PM

भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या त्याच्या विनोदी संवादांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, आज, 22 जून रोजी रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो खूप संतापलेला दिसत आहे. त्याचा राग इतका अनावर होतो की तो एका माणसाला ढकलतो. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा टी-शर्ट, पॅन्ट, चष्मा आणि टोपीमध्ये अत्यंत स्टायलिश दिसत आहे. पाचव्या सेकंदात, शांत असलेला रोहित संतापतो आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या एका माणसाला खांद्याला पकडतो आणि मागे ढकलतो. त्यानंतर तो त्या माणसाला काहीतरी बोलतो. कदाचित रागाच्या भरात रोहितने त्याला काही सल्ला दिला असेल. या घटनेनंतर, जेव्हा एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढतो, तेव्हा रोहित शर्माचा स्वभाव बदलतो.

रोहितच्या व्हिडिओची जोरदार चर्चा

व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की, हा माणूस रोहित शर्माचा बॉडीगार्ड आहे. तो चाहत्यांना रोहितपासून दूर ठेवत होता. हे हिटमॅनला आवडले नाही, म्हणून त्याने त्या माणसाला बाजूला ढकलले आणि चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज दिली. या घटनेनंतर, रोहित विमानतळात प्रवेश करत असताना, त्याने त्या माणसाला बोलावून त्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. शर्माच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण चाहत्यांप्रती त्याने व्यक्त केलेल्या आदराची प्रशंसा करत आहेत, तर काहीजण त्याच्या बॉडीगार्डशी केलेल्या वागणुकीवर टीका करत आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा मुंबईहून दिल्लीला प्रवास करत आहे. त्याला यावर्षी प्रजासत्ताक दिनी भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्री, प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो राजधानीत येत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात 16, दुसऱ्या सामन्यात 48 आणि तिसऱ्या सामन्यात 76 धावा केल्या. यानंतर, रोहित 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दिसणार आहे.

Follow Us