AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यासाठी डोकेदुखी… रोहित शर्मा इतकं चागलं खेळूनही कॅप्टन गिल असं का म्हणाला?

भारत अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली असून ही मालिका भारताने जिंकली. या मालिकेनंतर कर्णधार शुभमन गिलने रोहित शर्माबद्दल मोठे विधान केले आहे.

माझ्यासाठी डोकेदुखी... रोहित शर्मा इतकं चागलं खेळूनही कॅप्टन गिल असं का म्हणाला?
shubman gill
| Updated on: Jun 21, 2026 | 10:11 AM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना चेन्नई येथे खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्माची बॅट शांत राहिली होती, ज्यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. इंग्लंडविरुद्धची रोहितची शेवटची मालिका असणार असे म्हटले जात होते. रोहितचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात रोहितने पुनरागमन केले आणि 79 धावांची शानदार खेळी केली. रोहितने बॅटने जोरदार कमबॅक करत सगळ्यांची तोंड बंद केली. रोहितच्या जोरदार कमबॅकनंतर आता तो 2027 चा विश्वचषकापर्यंत संघात टिकून राहिल अशी शक्यता नाकारता येत नाही. रोहितच्या कमबॅकनंतर, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने रोहित शर्माबद्दल एक विधान केले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 16 धावांवर धावबाद झाला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 48 धावा करून तो बाद झाला. यानंतर, त्याने क्रीजवर बराच वेळ घालवला आणि तिसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंपैकी एक असलेल्या रोहित शर्माबद्दल विजयानंतर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली.

गिल म्हणाला की, “सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असणे ही कर्णधारासाठी एक चांगली डोकेदुखी आहे. इंग्लंड दौऱ्यावर काय होईल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. संघ जाहीर झाल्यानंतरच सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली जाईल. आम्हाला प्रत्येक खेळाडूचे निरीक्षण करावे लागेल आणि त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ शकतो. ” आतापर्यंत शुभमन गिल आणि रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करत होते.

मात्र, जेव्हा विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला, तेव्हा यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली. पहिल्या सामन्यात गिल आणि रोहितने सलामी दिली, पण दुसऱ्या सामन्यात कर्णधार गिलने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत जैस्वालला त्याची जागा दिली. तर तिसऱ्या सामन्यातही जयस्वालला सलामीची संधी दिली. तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरला पाठवले. जयस्वालने तिसऱ्या सामन्यांमध्ये आणखी एक शतक झळकावून आपल्या जागेसाठी प्रबळ दावा केला. मात्र, कोहलीच्या पुनरागमनामुळे, रोहित चांगल्या फॉर्ममध्ये असूनही, त्याला बाहेर बसावे लागू शकते. यामुळेच अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकूनही गिलची चिंता संपलेली नाही.

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल