Rohit Sharma Retirement : रोहित शर्माविरोधात शिजत होता मोठा कट? पण नेमकं… ‘निवृत्ती’आधी पडद्यामागे काय घडलं?

रोहित शर्माच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, आता रोहित शर्माच्या या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या या तडकाफडकी निर्णयामागे अन्य काही कारणे आहेत, असं म्हटलं जात आहे.

Rohit Sharma Retirement : रोहित शर्माविरोधात शिजत होता मोठा कट? पण नेमकं... निवृत्तीआधी पडद्यामागे काय घडलं?
Rohit Sharma Retirement
| Updated on: May 07, 2025 | 9:26 PM

Rohit Sharma Retirement : भारताचा स्टार फलंदाज आणि गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, आता रोहित शर्माच्या या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रोहितच्या या निर्णयामागे अन्य काही कारणं असू शकतात, असं म्हटलं जात आहे.

बीसीसीआयच्या मनात नेमकं काय चालंल होतं?

मिळालेल्या माहितीनुसार कसोटी क्रिकेटबाबत बीसीसीआय काही दिवसांपासून वेगळा विचार करत होते. आगामी कसोटी सामन्यांत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अन्य खेळाडूवर सोपवण्याचा विचार बीसीसीआयकडून केला जात होता. तसा निर्णयही घेण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झाली नव्हती. आयपीएल 2025 नंतर भारत इंग्लंडसोबत एकूण पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होता. याच मालिकेसाठी बीसीसीआय टीम इंडियाचे नेतृत्त्व नव्या खेळाडूकडे सोपवण्याचा विचार करत होते. याबाबतचा निर्णयही अंतिम झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हा निर्णय जाहीर होण्याआधीच रोहित शर्माने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करून टाकला आहे.

रोहित शर्माने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीचे कारण बीसीसायचा कर्णधारपदाचा निर्णय तर नाही ना? असा सवाल केला जात आहे.

रोहित शर्माने नेमकं काय म्हटलं आहे?

रोहित शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला आहे. त्याने आपल्या स्टोरीमध्य कसोटी क्रिकेटची टोपी ठेवली आहे. तेसच इंग्रजी भाषेत आपल्या निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. देशासाठी खेळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. मी यापुढे एकदीवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे, असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने नेमकं काय सांगितलं?

रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बीसीसीआयनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल. आम्हाला रोहितबद्दल अभिमान आहे, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.