
गेल्या बऱ्याच काळापासून फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी आपला आवडता संघ पाकिस्तान निवडला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुबईतील स्टेडिअममध्ये पाकिस्तानिविरुद्धच्या सामन्यात ‘चेस मास्टर’विराटने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली आणि भारतावर सहा गडी राखून विजय तर मिळवून दिलाच पण सेमी फायनलमध्येही नाव ऑलमोस्ट फायनल केलं. मात्र सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जिंकण्यासाठी कमी धावा हव्या असल्यामुळे विराटचे शतक हुकतं की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती.
विराटच्या शतकावर सस्पेन्स
43वे षटक सुरू झाले तेव्हा भारताला विजयासाठी चार धावा आणि विराट कोहलीला शतकासाठी पाच धावांची गरज होती. फिरकीपटू खुशदिल शाहच्या पहिल्याच चेंडूवर एकेरी घेत विराटने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने सिंगल घेत विराट कोहलीला स्ट्राईक परत दिला. त्यामुळे आता विजयासाठी फक्त दोन धावा आणि विराटला शतकासाठी चार धावा हव्या, असे समीकरण झालं होतं.
कोहलीच्या शतकासाठी रोहित अधीर
याचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. खुद्द विराटलाही माहीत होते की, शतकं काही दररोज होत नाहीत. तोही या शतकाची आतुरतेने वाट पाहत होता. पण या शतकासाठी तो एकटाच अधीर नव्हता. पॅव्हेलियनमध्ये उपस्थित कर्णधार रोहित शर्माही तितकाच बेचैन होता. त्याचवेळीन कॅमेरामनने त्याच्यावर कमेरा फोकस केला तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहितने विराटला शानदार सिक्स मारत शतक पूर्ण करण्याचा इशारा दिला.
Bromance of Virat Kohli & Rohit Sharma 🫂😍
Chase master defeated Pakistan & IITianBaba in style🔥#INDvsPAK #ViratKohli𓃵
pic.twitter.com/6aravFgupb— Veena Jain (@DrJain21) February 23, 2025
चौकार फटकावत विराटने पूर्ण केली इच्छा
त्यानंतर विराट कोहलीने 43व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खुशदिल शाहच्या बॉलवर विजयी चौकार मारून भारताला तर विजय मिळवून दिलाच शिवाय त्याने वनडेतील आपलं 51वं शतकही पूर्ण केलं. या शानदार शतकाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे इशारा केला आणि म्हणाला… मी बोलले होतो.. मैं हूं ना.. रिलॅक्स ! ते पाहून रोहितच्या चेहऱ्यावरही हास्य विलसलं. त्या दोघांच्या इशारेबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.