Rohit Sharma: तुझ्यावर पर्पल रंग शोभेल तू ये केकेआरमध्ये…भर कार्यक्रमात रोहितला ऑफर, हिटमॅनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
Rohit Sharma On KKR: रोहित शर्माचा नवा टिव्ही शो सुरु झाला असून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित केकेआरमध्ये जाणार की मुंबई इंडियन्समध्ये राहणार यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत कायम राहणार का? हा प्रश्न मागील काही कालापसून चर्चेत राहिला आहे. या प्रश्नावर अखेर रोहित शर्माने त्याच्या शोमध्ये उत्तर दिले आहे.
रोहित शर्माचा मित्र आणि केकेआरचा हेड कोच अभिषेक नायरने रोहित शर्माला केकेआरमध्ये यायची ऑफर दिली, ज्यावर रोहित शर्माने पटकन एक उत्तर दिले ज्यमुळे चाहत्यांनाही आनंद होईल.
रोहित शर्माचा नवा टीव्ही शो 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा' या कार्यक्रमात अभिषेक नायरने उपस्थिती लावली. या कार्यक्रमात रोहित शर्माने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते, यावरून नायरने रोहित शर्मावर निशाणा साधला. रोहितचे पिवळ्या रंगाचे कपडे पाहून हे त्याचे सीएसकेमध्ये जायचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न अभिषेक नायरने विचारला,
यानंतर त्याने केकेआरचा एँगलही जोडला. पर्पल कलरचे कपडेही चांगले रोहितवर दिसतील, असं नायर म्हणाला. यावर प्रेक्षकांनी जोरजोरात मुंबई मुंबई अशी घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी ऐकून रोहितनेही फॉरएव्हर अशी प्रतिक्रिया दिली.
रोहितच्या या रिएक्शनवरून हिटमॅन कायम मुंबईसाठीच खेळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मात्र आनंद झाला.