रोहित शर्माच्या बायकोने घेतले आलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का! हिटमॅनचा पगारही…

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने मुंबईत नवे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत इतकी आहे की रोहीत शर्माच्या IPLचा पगार देखील त्यापुढे कमी आहे. जाणून घ्या सविस्तर...

रोहित शर्माच्या बायकोने घेतले आलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का! हिटमॅनचा पगारही...
ritika house
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 08, 2026 | 5:12 PM

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने नवीन घर खरेदी केले आहे. हे घर त्यांनी मुंबईत घेतले असून त्याची किंमत २६.३० कोटी रुपये आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने आपली ही नवीन प्रॉपर्टी प्रभादेवीमध्ये असलेल्या अहूजा टॉवर्समध्ये खरेदी केली आहे. ही एक रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग अहूजा कन्स्ट्रक्शनने विकसित केली आहे. रितिका सजदेह हिने खरेदी केलेल्या नव्या अपार्टमेंटची किंमत तर कोट्यवधींमध्ये आहेच, शिवाय त्यात अनेक खास वैशिष्ट्येही आहेत.

रितिका सजदेहच्या नव्या अपार्टमेंटमध्ये काय आहे खास?

आता प्रश्न असा आहे की रितिका सजदेहच्या नव्या अपार्टमेंटची वैशिष्ट्ये काय आहेत? रितिकाच्या नव्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २,७६०.४० चौरस फूट आहे आणि त्यासोबत त्यात तीन कार पार्किंगची जागाही आहे. रितिका हिने हे घर १२ डिसेंबर २०२५ रोजी नोंदवले होते. त्यांना व्यवहारावर ₹१.३१ कोटीची स्टॅम्प ड्युटी आणि ₹३०,००० नोंदणी शुल्क लागले होते.

रोहितच्या पत्नीने कोणाकडून खरेदी केले नवे घर?

मिळालेल्या माहितीनुसार, रितिका हिने नवे अपार्टमेंट अजिंक्य दत्तात्रय पाटील आणि पूजा अजिंक्य पाटील यांच्याकडून खरेदी केले होते. रितिका सजदेह हिने कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंटमध्ये स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम केले आहे, जिथे त्यांनी अनेक नावाजलेल्या खेळाडूंसाठी एंडोर्समेंट आणि ब्रँड असोसिएशन हाताळले होते.

जिथे घर खरेदी केले त्या परिसराची खासियत

प्रभादेवी हा शहरातील भाग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सेनापती बापट मार्ग, डॉ. अॅनी बेसेंट रोड आणि वेस्टर्न रेल्वे लाइनने चांगल्याप्रकारे जोडलेला आहे. तसेच येथून बांद्रा-वर्ली सी लिंकपर्यंतही सहज पोहोचता येते. प्रभादेवी शहरातील मुख्य व्यवसाय डिस्ट्रिक्ट आणि लाइफस्टाइल हबशी निगडित आहेत.

रोहितचा IPL पगारही घराच्या किंमतीपुढे कमी

रितिका सजदेह हिने खरेदी केलेल्या अपार्टमेंटची किंमत २६.३० कोटी रुपये आहे, जो रोहित शर्माच्या IPL पगारापेक्षा कितीतरी जास्त आहे. रोहित शर्माचा IPL पगार १६ कोटी रुपये आहे.