Sachin Tendulkar | लारा आणि गेलने निवृत्तीनंतर दिलेल्या भेटवस्तूचा सचिनकडून 7 वर्षानंतर खुलासा

| Updated on: Nov 17, 2020 | 8:34 PM

सचिनने 16 नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Sachin Tendulkar | लारा आणि गेलने निवृत्तीनंतर दिलेल्या भेटवस्तूचा सचिनकडून 7 वर्षानंतर खुलासा
Follow us on

मुंबई : 16 नोव्हेंबर 2013 क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक दिवस. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) निवृत्त झाला. 200 व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर क्रिकेट विश्वाने, चाहत्यांनी, बीसीसीआयने सन्मानाने निरोप दिला. सचिनच्या या 200 व्या सामन्यासाठी आणि निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं. सचिनने आपल्या कसोटीतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वेस्टइंडिजविरुद्ध खेळला. यानंतर सर्वच स्तरातून सचिनला स्मरणात राहिल अशा काही भेटवस्तू आजी माजी खेळाडूंकडून देण्यात आल्या. वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांनीही एक भेटवस्तु दिली होती. ती भेटवस्तु काय आहे, हे सचिनने सांगिलतं आहे. सचिनने याबाबतचा खुलासा तब्बल 7 वर्षानंतर केला आहे. याबाबत सचिनने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. sachin tendulkar reveals gifts given by chris gayle and brian lara after retirement

सचिनने क्रिकेटमधील निवृत्तीच्या 7 वर्षानंतर एक व्हिडीओ ट्विट केलाय. “निवृत्तीच्या दिवशी मला वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाकडून स्टीलपासून बनवण्यात आलेला ड्रम बँड भेट देण्यात आला. ब्रायन लारा आणि ख्रिस गेल या दोघांनी बोर्डाच्या वतीने मला हा ड्रम बॅंड दिला. यासाठी मी त्यांचा जन्मभर ऋणी राहिल. त्यांनी दिलेल्या प्रेम आणि सन्मानासाठी मी त्यांचा आभारी आहे. जेव्हा लारा घरी आला होता तेव्हा त्याने हा बॅंड वाजवला होता”, असं म्हणत सचिनने वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे आभार मानले. तसेच जुन्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच या व्हिडीओमध्ये सचिनने बॅंड वाजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी तुमचा आभारी आहे, असं म्हणत सचिनने या व्हिडीओचा शेवट केला.

एकमेवाद्वितीय सचिन

सचिन कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच सचिन शतकांचं शतक लगावणाराही एकमेव खेळाडू आहे. सचिनने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत मिळून एकूण 100 शतक लगावली आहेत. तसेच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच विक्रम अजूनही सचिनच्या नावावर अबाधित आहे.

संबंधित बातम्या :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 10 वर्षांपासून प्रतिसाद नाही!, मुंबई महापालिकेने नागरी सत्कार गुंडाळला

sachin tendulkar reveals gifts given by chris gayle and brian lara after retirement