Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर आजोबा होणार? अर्जुन-सानिया देणार लवकरच गुडन्यूज, साराने शेअर केलेल्या Video ची चर्चा
Arjun Tendulkar Saaniya Chandok: सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. त्याची पत्नी सानिया चांडोक ही गरोदर असल्याची चर्चा आता व्हायरल व्हिडिओमध्ये रंगत आहे.

Sachin Tendulkar Grandfather: सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा तेंडुलकरने गेल्या महिन्यात आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबीय आणि मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. कुटुंबातील विविध सदस्यांनी साराची विविध स्वप्ने पूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त केली बहुतेक कुटुंबीयांनी तिला एक चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी आशीर्वाद व्यक्त केले. स्वतः सचिन तेंडुलकरनेही साराला एक चांगला जोडीदार मिळावा यासाठी आशीर्वाद दिला. साराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी तिला मनापासून आणि काही मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत. पण या व्हिडिओमध्ये एका गोष्टीने लक्षवेधलं गेले आहे.
साराने शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा
या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, भाऊ अर्जुन तेंडुलकर, वहिनी सानिया चंडोक आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसत होते. त्या प्रत्येकाने आळीपाळीने साराला शुभेच्छा दिल्या. काहींनी तिला सुखी आयुष्यासाठी, तर काहींनी यश आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या. पण या व्हिडिओमध्ये साराची वहिनी सानिया चांडोकची आईने ज्या शुभेच्छा दिल्या त्याची आता चर्चा रंगत आहे.
सानियाच्या आईने साराला अशा शुभेच्छा दिल्या की, तू लवकरच दोन जुळ्या मुलांची आत्या होऊदे. यावरुन आता अर्जुन तेंडुलकर हा लवकरच बाबा बनणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. सानिया चांडोक ही गरोदर असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. जर खरंच असं असेल तर सचिन तेंडुलकर लवकरच आजोबा होणार आहे.
या व्हिडिओमध्ये साराला बहुतेक शुभेच्छा या तिच्या लग्नासाठी मिळाल्या आहेत. साराला तिच्या आजीकडून, वडिल सचिन तेंडुलकर यांच्याकडून, आजोबांकडून, वहिनीकडून लग्नासाठीच्या शुभेच्छा मिळाल्या. तुला लवकरात लवकर एक चांगला मुलगा भेटू दे आणि तू त्याच्यासाठी लग्न कर, असं शुभेच्छा देताना कुटुंबीयांनी इच्छा व्यक्त केली आहे.