Salman Khan: मला फक्त एकच रामायण माहित आहे आणि ते म्हणजे…सलमान खानचं रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाबद्दल धक्कादायक विधान

Salman Khan On Ramayana Movie: सलमान खानने नुकताच प्रदर्शित झालेल्या रामायण चित्रपटाबद्दल एक विधान केले आत ते चांगलेच चर्चेत आले आहे.

Salman Khan: मला फक्त एकच रामायण माहित आहे आणि ते म्हणजे...सलमान खानचं रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाबद्दल धक्कादायक विधान
| Updated on: Nov 07, 2026 | 9:23 AM

Salman Khan On Ramayana: सलमान खान सध्या त्याच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या युद्धपटाचे प्रमोशन करत आहे. काल एक प्रमोशनल कार्यक्रमात त्याच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. अनेक माध्यमातील लोकांनी यावेळी सलमानला अनेक प्रश्न विचारले. मातृभूमी चित्रपटाबद्दलही त्याला अनेक प्रश्न विचारले. सलमानला नुकताच प्रदर्शित झालेल्या रामायण चित्रपटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने जे उत्तर दिले त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.

माध्यमांनी सलमानला रणबीर कपूरच्या ४००० कोटींच्या ‘रामायण’बद्दल प्रश्न विचारले, ज्यावर भाईजानने या या चित्रपटाबद्ल आपले मत मांडले. भाईजान हसून म्हणाला, “रामायण म्हणजे एकच, मी फक्त रामानंद सागर यांचे रामायण पाहिले आहे.” यावरुन स्पष्टपणे कळून येते की सलमान खानने अजून रामायण चित्रपट पाहिलेला नाही. आणि कदाचित तो पाहणारही नाही असं दिसून येत आहे.

Loading...

सलमान खान पुढे म्हणाला, “माझ्या मते ‘रामायणा’बद्दलची चर्चा ही चित्रपटावरच केंद्रित असायला हवी, त्याच्या VFX खर्च, निर्मिती खर्च किंवा इतर गोष्टींवर नसली पाहिजे. चित्रपटाच्या ४,००० कोटी रुपयांच्या बजेट आणि VFX बद्दलची सर्व चर्चा निरर्थक आहे. चर्चा ‘रामायण,’ राम, सीता आणि रावण यांच्याबद्दल व्हायला हवी. VFX वगैरे काही खरं नाही. मातृभूमीमधील माझं पात्र हे रामासारखेच आहे,  त्यात मी सर्वोत्तम मुलगा,  सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम वडिलांच्या भूमिकेत आहे.”

रामानंद दिग्दर्शित आणि निर्मित ‘रामायण’ ही मालिका २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली. या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू राम, दीपिका चिखलिया यांनी माता सीता, सुनील लाहरी यांनी लक्ष्मण, दारा सिंग यांनी हनुमान आणि अरविंद त्रिवेदी यांनी रावण यांची भूमिका साकारली होती. वाल्मीकि रामायण, रामचरितमानस आणि रामाच्या इतर कथांवर आधारित ही मालिका ७८ भागांची होती. कोविड-१९ महामारीच्या काळात ती पुन्हा प्रसारित झाली आणि प्रचंड लोकप्रिय ठरली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us