Sania Mirza : पॅनिक अटॅक यायचे, संपूर्ण शरीर…, घटस्फोटानंतर भयानक झालेली सोनिया मिर्झाची अवस्था, जाणून व्हाल हैराण

Sania Mirza : सानिया मिर्झा आणि 10 वर्षांच्या मुलाला सोडून शोएब मलिनने थाटला तिसरा संसार, घटस्फोटानंतर भयानक झालेला सानियाची अवस्था..., म्हणाली, 'पॅनिक अटॅक यायचे, संपूर्ण शरीर...', सर्वत्र सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Sania Mirza : पॅनिक अटॅक यायचे, संपूर्ण शरीर..., घटस्फोटानंतर भयानक झालेली सोनिया मिर्झाची अवस्था, जाणून व्हाल हैराण
सानिया मिर्झा
Updated on: Nov 13, 2025 | 12:45 PM

Sania Mirza : माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर सानिया हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला… आता नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सानिया हिने घटस्फोटानंतर समोर आलेल्या परिस्थितीबद्दल मोठा खुलासा केला आहे. घटस्पोटानंतर सानिया पॅनिक अटॅक आलेला आणि संपूर्ण शारीर देखील थरथर कापत होतं… सांगायचं झालं तर, सानिया हिने नवा यूट्यूब टॉक शो ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये कोरियोग्राफर फराह खान गेस्ट म्हणून आलेली. तेव्हा शोमध्ये सानियाने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

सानिया मिर्झा म्हणाली, ती वेळ सानियाच्या सर्वात कठीण काळाबद्दल एक होती. तेव्हा फराह खान सेटवर पोहोचली होती आणि सानिया हिला लाईव्ह शोसाठी तयार केलं होतं. सानिया म्हणाली, ‘मला हे कधीच कॅमेऱ्यासमोर बोलायचं नव्हतं…पण एक अशी वेळ होती, जी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वेळ होती… तेव्हा फराह माझ्या सेटवर आली आणि मला मला लाईव्ह शोसाठी तिने तयार केलं… मी थरथर कापत होती आणि जर तू आली नसती तर मी शो करू शकली नसती. तू (फराह) मला म्हणालीस, ‘ठीक आहे, तू शो करशील.”

घाबरली होती फराह खान

फराह खान हिने देखील तो दिवस आठवला आणि म्हणाली, ‘मी देखील घाबरलेली होती… मला प्रचंड भीती वाटत होती. मला त्या दिवशी शुटिंग करायचं होतं. पण मी सर्वकाही सोडलं आणि सानिया हिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.. तेव्हा मला फक्त आणि फक्त माझ्या मैत्रिणीच्या सोबत राहायचं होतं…’ सांगायचं झालं तर, सानिया मिर्झा आणि फराह खान चांगल्या मैत्रिणी आहेत…

याचवेळी फराह हिने सानिया हिचं कौतुक देखील केलं. कारण घटस्फोटानंतर सानिया ‘सिंगल मदर’ म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. फराह म्हणाली. ‘एकटी हे सगळं करणं फार कठीण आहे… काम देखील करावं लागतं… मुलाचा सांभाळ करावा लगतो… त्याच्यासोबत वेळ व्यतीत करावा लागतो… आणि हे सर्व सानिया उत्तम प्रकारे करत आहे…’ सानिया आजही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

2010 मध्ये झालेलं सानिया आणि शोएब यांचं लग्न

सानिया मिर्झाने एप्रिल 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केलं. त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म 2018 मध्ये झाला. जानेवारी 2024 मध्ये, सानियाने शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली… हे तेव्हा घडलं जेव्हा शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसरं लग्न करण्याची घोषणा केली…