
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. सानियाने पाकिस्ताने क्रिकेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतला. शोएबने लगेचच तिसरे लग्नही केले. मात्र, सानिया मिर्झा अजूनही सिंगल आहे. ज्यावेळी हे नाते तुटण्याच्या रस्त्यावर होते, त्यावेळी आपल्याला कशाप्रकारचा त्रास होत होता आणि घटस्फोटानंतर आयुष्यात काय काय बदल झाले हे सानिया मिर्झा सांगताना दिसली. शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर अनेक दिवस शांत राहण्याचा प्रयत्न सानियाने केला. यावेळी आपली अवस्था कशी होती हे देखील तिने सांगितले. ती थरथर कापत होती आणि तसेच काम करत होती. सानिया आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा असून त्याची जबाबदारी सानिया मिर्झावर आहे. सानिया आपल्या लेकासोबत दुबईतच राहते.
करण जोहर याच्यासोबत शोमध्ये बोलताना सानिया मिर्झा हिने अनेक गोष्टींवर थेटपणे भाष्य केले. हेच नाही तर यावेळी ती सिंगल पालक असल्याने कोणकोणत्या गोष्टींना सामोर जावे लागते हे सांगताना दिसली. मुलाला एकट्याला दुबईत सोडून भारतात कामानिमित्त येणे ही सर्वात कठीण गोष्ट असल्याचे सानिया मिर्झाने स्पष्ट म्हटले. हेच नाही तर रात्री एकटे बसून जेवण देखील जात नसल्याचे सानियाने म्हटले. एकटे बसून काय जेवण करायचे…
सानिया मिर्झा हिच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत होते की, तिला एकटे राहणे किती जास्त कठीण आहे. ती रात्री जेवण देखील करत नाहीये. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटानंतर सानियाचे नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याच्यासोबत जोडले गेले होते. मात्र, यावर सानिया किंवा मोहम्मद शमी या दोघांनीही अजिबात बाष्य केले नाही. सानियाला सध्या तिच्य आयुष्यात एकटेपणा जाणवत आहे.
सानियाच्या बोलण्यावरून जाणवत होते की, तिला तिच्या आयुष्यात जोडीदाराची नक्कीच गरज आहे. सानिया मिर्झाने दुसरे लग्न करण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सानियाने शोएब मलिक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शाहिद कपूरला डेट केल्याचे सांगितले जाते. अनेक लोकांसोबत सानियाचे नाव जोडली गेली आहेत. आता सानिया खरोखरच दुसरे लग्न करते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.