
भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. या काळात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल चर्चेत राहिला. त्याने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि 700 पेक्षा अधिक धावाही केल्या. त्याच वेळी, मैदानाबाहेरही गिलची लोकप्रियता वाढलेली दिसली. याचदरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची साडकी लेक सारा तेंडुलकर सुद्धा इंग्लंडमध्ये दिसली होती. एवढंच नव्हे तर सारा आणि शुबमन हे दोघे एका इव्हेंटमध्ये देखील दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वच ठिकाणी सारा आणि गिल यांचीच चर्चा सरू होती. या दोघांशी निगडीत एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
शुबमनचा साराचा तो व्हिडीओ व्हायरल
खरंतर गेल्या महिन्यात, म्हणजेच 8 जुलै 2025 रोजी माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंग याने त्याच्या यूवी फांऊडेशनसाठी एक चॅरिटी डिनर आयोजित केला होता. कॅन्सरबद्दल जागरूकता आणि उपचारांसाठी निधी उभारण्यासाठी हा कार्यक्रम होता. ज्यामध्ये अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. शुबमन गिल देखील संपूर्ण टीमसह येथे पोहोचला. तर सचिनची लेक, सारा तेंडुलकर ही देखील तिथे उपस्थित होती. त्यानंतर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तेव्हा असा दावा करण्यात आला की जेव्हा शुभमन गिल कार्यक्रमात पोहोचला तेव्हा सारा तिथे आधीच उपस्थित होती आणि गिल तिच्या समोरून गेला, परंतु यादरम्यान त्याने साराकडे पाहिलेही नाही.
पण आता याच इव्हेंटमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर हास्यही दिसून आले. गिल आणि सारा खूप आनंदी दिसत होते. शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत अनेकदा जोडले गेले आहे. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या अफवा चर्चेत होत्या. याच दरम्यान आता त्यांच्या दोघांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये ट्रेंड होत आहे.
गिलसाठी इंग्लंड दौरा संस्मरणीय
शुभमन गिलचा 2025 मधील इंग्लंड दौरा खूपच शानदार आणि ऐतिहासिक होता. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी साधली, ज्यामध्ये गिलने सर्वात मोठी भूमिका बजावली. गिलने 8 डावांमध्ये 754 धावा केल्या, ती या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या होती. याच मालिकेत त्याने त्याने चार शतके झळकावली, ज्यात 269 धावांचा समावेश होता. त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा खिताबही देण्यात आला.