IND vs AUS A : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील दुसरा सराव सामना अनिर्णित

| Updated on: Dec 13, 2020 | 7:24 PM

सराव सामन्यांनंतर आता 17 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

IND vs AUS A : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील दुसरा सराव सामना अनिर्णित
Follow us on

एडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सराव सामना (Australia A vs India 2nd Practice Match)अनिर्णित राहिला. 3 दिवसांच्या डे-नाईट सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघाला शेवटच्या दिवशी 473 धावांची आवश्यकता होती. मात्र 4 विकेट्सवर 3०7 धावा असताना सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. ऑस्ट्रेलिया अ साठी बेन मॅकडरमेट आणि जॅक विल्डरमथ यांनी शानदार शतक झळकावत भारतीय संघाला विजयापासून दूर ठेवलं. यासह आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एडिलेड येथे 17 डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. Second practice match between Team India v Australia A draw

कसोटी मालिकेआधीचे दोन्ही सराव सामने हे अनिर्णित राहिले. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. मात्र दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार बॅटिंग केली. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. मात्र तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करता आले नाही. परिणामी सामना अनिर्णित राहिला.

टीम इंडियाने दुसरा डाव 386 धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलिया ए खेळण्यासाठी आली. ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच झटके दिले. मोहम्मद शमीने मार्कस हॅरिसला आणि जो बर्न्स या सलामी जोडीला माघारी पाठवलं.

त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. सिराजने निक मॅडिन्सनला 14 धावांवर बाद केलं. यामुळे ऑस्ट्रेलिया ए ची 25-3 अशी अवस्था झाली. मात्र यानंतर कर्णधा अॅलेक्स कॅरी आणि बेन मॅक्डरमट या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली.

कर्णधार अजिंक्य रहाणेने नवदीप सैनीला गोलंदाजीची संधी दिली. नवदीपने एकूण 16 ओव्हरमध्ये 87 धावा दिल्या. त्याने गोलंदाजीदरम्यान बाउन्सर टाकून कांगारुंना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विकेट घेण्यात यश आले नाही.

कर्णधार रहाणेने पार्ट टाईम फिरकीपटू हनुमा विहारीला गोलंदाजीची संधी दिली. हनुमा विहारीने रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला. हनुमाने कर्णधार अॅलेक्स कॅरीला 58 धावांवर बाद केलं. मात्र यानंतर टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

रहाणेने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीकडून पहिल्या कसोटीच्या दृष्टीने फार गोलंदाजी करुन घेतली नाही. याचाच फायदा कांगारुंनी घेतला. बेन मॅकडर्मोट आणि जॅक वाइल्डर्मथ या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.

संबंधित बातम्या :

IND vs AUS : रोहितबाबत बीसीसीआयची मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक फिटनेस टेस्ट क्रिकेट

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू परतला, टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

Second practice match between Team India v Australia A draw