IND vs AUS : रोहितबाबत बीसीसीआयची मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक फिटनेस टेस्ट

ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

IND vs AUS : रोहितबाबत बीसीसीआयची मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक फिटनेस टेस्ट
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 5:33 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma)शुक्रवारी 11 डिसेंबरला बंगळुरु येथील एनसीएमध्ये (NCA) फिटनेस टेस्ट दिली. या फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास झाला. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरोधात शेवटच्या 2 कसोटीत अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी रोहितला आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. Rohit Sharma will have to undergo another fitness test for the Test series against Australia BCCI said

बीसीसीआयने रोहित ऑस्ट्रेल्यासाठी केव्हा निघणार याबाबत अजूनही माहिती दिली नाही. मात्र रोहित फिटनेस टेस्ट पास झाल्याने ऑस्ट्रेलियाला जाणार हे निश्चित आहे. रोहित ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर नियमांनुसार 14 क्वारंटाईन राहणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतरच रोहितला टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये जाण्याची परवानगी मिळेल.

रोहितला कसोटी सामन्यात स्थान मिळवण्यासाठी क्वारंटाईन कालावधीत तगडा सराव करावा लागणार आहे. रोहितने या क्वारंटाईन कालावधीत काय करायचं याबाबतंच वेळापत्रक देण्यात येणार आहे. या क्वारंटाईन कालावधीनंतर रोहितची फिटनेस टेस्ट केली जाईल. या फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे रोहितचे सर्व भवितव्य हे या फिटनेस चाचणीच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

रोहितच्या फिटनेसबाबत वैद्यकीय पथक संतुष्ट

रोहित पूर्णपणे दुखापतीतून सावरला आहे. रोहितच्या प्रकृतीवरुन बीसीसीआयचे वैद्यकीय पथक संतुष्ठ आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या निवेदनात देण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये रोहितकडून बॅटिंग, फिल्डिंग करण्यास सांगितलं. याद्वारे रोहितची चाचणी घेण्यात आली.

आयपीएलच्या 13 व्या मोसमात दुखापत

रोहितला आयपीएलच्या 13 व्या मोसमात हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली. म्हणजेच त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. यामुळे रोहितला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागले होते. दरम्यान आता रोहितच्या या दुसऱ्या फिटनेस टेस्टचा निकाल काय येतो, याकडे सर्व क्रिकेट चांहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास

शानदार जबरदस्त ! जसप्रीत बुमराहची अर्धशतकी खेळी, सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’

Rohit Sharma will have to undergo another fitness test for the Test series against Australia BCCI said

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.