IND vs PAK : सामन्याच्या तीन तास आधीच शोएब अख्तरचं शेवटचं विधान, क्रिकेट जगतात मोठं वादळ

शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी पाकिस्तानला आक्रमक खेळ आणि नाणेफेक जिंकून मोठे धावा करण्याचा सल्ला दिला. भारताची ताकद ओळखत असतानाही, अख्तरने पाकिस्तानच्या संघात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

IND vs PAK : सामन्याच्या तीन तास आधीच शोएब अख्तरचं शेवटचं विधान, क्रिकेट जगतात मोठं वादळ
shoaib akhtar 1
| Updated on: Feb 23, 2025 | 12:10 PM

Shoaib Akhtar Statement on IND vs PAK Champions Trophy 2025 : टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) दरम्यान आज दुबईत मोठी भिडत होणार आहे. भारताने टुर्नामेंटच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर पाकिस्तानने न्यूझीलंडविरोधातील आपला पहिला सामना 60 धावांनी गमावला आहे. असं असलं तरी दोन्ही संघ चार संघांच्या ग्रुप एमधील अंक तालिकेत (Champions Trophy 2025 Points Table) शेवटच्या स्थानावर आहेत. भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना होत असल्याने दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. सध्या तरी रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubman Gill) ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलेलं आहे. विराट कोहलीलाही (Virat Kohli vs PAK) सूर गवसला तर पाकिस्तानला मायदेशी जाणंही मुश्किल होईल, असा अंदाज आहे. त्याच सोबत मोहम्मद शमीची (Mohammad Shami) वेगवान गोलंदाजी सुद्धा पाकिस्तान समोर काळ बनून उभी राहण्याची शक्यता आहे.

शेवटचा संदेश

शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर भारत-पाकिस्तान सामन्याच्या तीन तास आधीच एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अर्थात शोएबचा हा संदेश पाकिस्तानी टीमसाठी आहे. पाकिस्तान- हिंदुस्थानचा सामना म्हणजे मोठा दिवस आहे. आपण पहिला सामना गमावला आहे, हे तुम्ही जाणतच आहात. भारतासोबतचा आपला दुसरा सामना आहे. तिसऱ्या सामन्यात वॉस आऊटचा धोका आहे. पाकिस्तान समोर अधिक समस्या आहेत. पण मला वाटतं पाकिस्तान समोर चांगले पर्यायही आहेत. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने 300 तरी धावा कराव्यात. तसं केल्यास ही मॅच पाकिस्तानच्या बाजूने येईल. गोलंदाजांनीही आक्रमक गोलंदाजी केली पाहिजे. पाकिस्तान संघाकडे सामना जिंकण्याची ताकद आहे. पाकिस्तान संघाने जिंकण्याचाच इरादा ठेवला पाहिजे. जिंकण्यासाठीच खेळलं पाहिजे. सकारात्मक मानसिकता ठेवून आपल्याला आक्रमक खेळाचं प्रदर्शन करावं लागेल, असं शोएबने म्हटलं आहे.

या चुका टाळा

यावेळी शोएबने कोणत्या चुका करू नये याचा सल्लाही पाकिस्तानी संघाला दिला आहे. कृपया स्वत:साठी खेळू नका. स्वत:साठी खेळण्यात काहीही अर्थ नाही. त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही स्वत:साठी खेळला तर लोक तुम्हाला स्मरणात ठेवत नाही. तुमच्या खेळाचा आनंदही लोक घेत नाहीत. तसेच तुमची इज्जतही लोक करत नाहीत. तुम्ही तुमच्यासाठी खेळला तर असंच होतं. निवृत्तीनंतर तुमचा लौकीक राहत नाही. त्यामुळे संघासाठी खेळा. खेळण्याचा प्रयत्न करा. आक्रमक व्हा, असा संदेशही शोएब अख्तरने दिला आहे. शोभने दिलेला सल्ला आणि टोचलेले कान यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.

भारताबाबत काय म्हणाला?

भारताकडे पाहा. भारतीय संघाकडे मोठी आणि मजबूत टीम आहे, यात शंका नाही. त्यांच्याकडे बॅटिंग ऑलराऊंडर, बॉलिंग ऑलराऊंडर, स्पिन ऑलराऊंडर आहेत. त्याशिवाय भारतीय संघ या फॉरमॅटला चांगल्या पद्धतीने जाणून आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. जर आज भारताने त्यांच्या टॅलेंटचं प्रदर्शन नाही केलं तर सर्वांचीच निराशा होईल. पण तरीही भारत आयसीसी ट्रॉफीमधील सर्वात मजबूत टीम आहे. त्यामुळेच भारतासमोर जिंकणं कठिण आहे. पण तरीही मी तुमच्यासोबत आहे. भारत किती मजबूत आहे, याने काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही कोणताही दबाव घेऊ नका. मान्य आहे, भारत एक मोठी टीम आहे. एक कठिण संघ आहे. एक अभेद्य संघ आहे. पण काही हरकत नाही. तुम्ही भारताविरोधात खेळत आहात. आता बुमराहही नाहीये. त्यामुळे तुम्ही भारताविरुद्ध खेळताना जिंकण्याचा प्रयत्न करा. स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्ही हे करू शकता, हे तुम्हालाही माहीत आहे, असं म्हणत शोएबने पाक टीममध्ये स्फूरण भरण्याचा प्रयत्न केला आहे.