
सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडियाने निराशाजनक सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी दारुण पराभव केला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. टीम इंडियाच्या या प्रदर्शनावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जोरदार टीका केली आहे. शोएब अख्तरने या पराभवासाठी टीम इंडियाच्या दोन ऑलराऊंडर्सना जबाबदार धरलं आहे. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेच्या कामगिरीवर शोएबने बोट ठेवलं. या दोघांनी मिळून 56 ओव्हर्समध्ये 67 धावा मोजल्या आणि फक्त एक विकेट काढला अशी टीका शोएब अख्तरने केली. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये 187 धावांचा डोंगर उभा केला.
“वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांच्यासारखा धाक त्यांच्या गोलंदाजीत नाहीय. त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या ओव्हरसाठी राखून ठेवणं टीम इंडियाला खूप महाग पडलं” असं शोएब अख्तरने म्हटलय. “हार्दिक आणि शिवम दुबे दोघे 120 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतात. ते म्हणजे माल्कम मार्शल नाहीत, जे दक्षिण आफ्रिकेसारख्या टीमच्या फलंदाजांवर धाक निर्माण करतील. तुम्ही त्यांचा वापर लास्ट ओव्हरमध्ये करणार असाल तर दक्षिण आफ्रिकेसारख्या टीमकडून तुम्ही प्रतिहल्ला टाळू शकत नाही” असं शोएब अख्तर म्हणाला.
शोएब अख्तरने भारतीय टीम मॅनेजमेंटला काय विनंती केली?
“वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड आहे. पण ज्या दिवशी वरुण चक्रवर्ती चालत नाही, त्यावेळी काय होतं हे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने उघड केलं” वरुण चक्रवर्तीच्या 4 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 47 धावा वसूल केल्या. त्या बदल्यात त्याला फक्त एकच विकेट मिळाला. “झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश करावा” अशी शोएब अख्तर भारतीय संघ व्यवस्थापनाला विनंती केली. “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपची उणीव जाणवली. कुलदीप यादव ही मिसिंग लिंक होती. टीमला गरज असताना तो विकेट मिळवून देतो. मॅच-विनर असल्याचं त्याने सिद्ध केलय” असं शोएबच मत आहे.
त्यावरही अनेक क्रिकेट पंडितांनी प्रश्न विचारलाय
वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजी कौशल्यात बऱ्यापैकी समानता असं तो म्हणाला. रविवारच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलला बसून वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात आलं. त्यावरही अनेक क्रिकेट पंडितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.