
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात तिसऱ्या वनडेमध्ये त्याच्या स्पिलिनला इंजरी झाली. कॅच पकडताना ही दुखापत झाली. त्याला ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात दाखल करावं लागलं. इंटरनल ब्लीडिंगमुळे श्रेयसच ऑपरेशनही करावं लागलं. आता श्रेयस त्याच्या दुखापतीमधून सावरतोय. पण क्रिकेट ग्राऊंडवर त्याच्या पुनरागमनासाठी त्याच्या चाहत्यांना अजून बरीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. येत्या 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. यात श्रेयस अय्यरला टीममध्ये स्थान मिळण्याची अजिबात शक्यता नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला अजून कमीत कमी तीन महिने मैदानाबाहेर रहावं लागणार आहे.
श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अय्यरने अलीकडेच आपल्या घराजवळ अल्ट्रासोनोग्राफी स्कॅन केलेलं. त्यानुसार त्याच्या प्रकृतीत योग्य सुधारणा होतेय. जखम भरतेय. पण त्याला ट्रेनिंग आणि एक्सरसाइज करता येणार नाहीय. श्रेयसच ऑपरेशन यशस्वी झालं. पण दीर्घकाळ मैदानापासून लांब रहावं लागणार ही वाईट बातमी आहे.
..तरच रिहॅब प्रोसेस सुरु करु शकतो
रिपोर्ट्सनुसार दोन महिने पूर्ण झाल्यानंतर श्रेयस अय्यरचं अजून एक USG स्कॅन होईल. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाबद्दल कुठला निर्णय घेतला जाईल. स्कॅननंतर सर्वकाही ठीक असेल तर श्रेयस बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये (COE) आपली रिहॅब प्रोसेस सुरु करु शकतो. जानेवारी महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध सीरीज आहे. त्यातही श्रेयसला खेळता येणार नाही. IPL 2026 आधी श्रेयसच्या पुनरागमनाची शक्यता नाहीय असाही काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय. म्हणजे आयपीएल 2026 मध्ये श्रेयस मैदानावर खेळताना दिसू शकतो.
श्रेयस आता कुठे आहे?
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियन फलंदाज एलेक्स कॅरीचा कॅच घेताना श्रेयस जमिनीवर पडलेला. इतका जोरात श्रेयस पडलेला की तो उभाही राहू शकत नव्हता. वेदनेने विव्हळणाऱ्या श्रेयसला बीसीसीआयची मेडीकल टीम मैदानाबाहेर घेऊन आली. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सिडनी आणि भारतीय तज्ज्ञांसोबत मिळून श्रेयसवर उपचार केले. श्रेयस आता भारतात आहे.