AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: तु मला लाईक करतोस मग…तरुणीचा श्रेयसबद्दल खळबळजनक दावा, इंग्लंडमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांची मालिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे आणि कारणही तसे आहे कारण भारतीय संघाचे वाईट प्रदर्शन. पण आता यादरम्यान श्रेयसचा एका तरुणीसोबतचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

IND vs ENG: तु मला लाईक करतोस मग...तरुणीचा श्रेयसबद्दल खळबळजनक दावा, इंग्लंडमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल
shreyas iyer
| Updated on: Jul 09, 2026 | 11:39 AM
Share

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना आज रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी  आतापर्यंत वाईट पाहायला मिळाली. संघाला आता अनेक गोष्टी सुधरवण्याची गरज आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघासाठी श्रेयसपर्व सुरु झाले असून त्याचा परिणाम तरी आतापर्यंत चांगला जाणवत नाहीये. आता कर्णधार श्रेयस अय्यर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आता श्रेयसचा एका मुलीसोबतचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी संघ नॉटिंगहॅमहून ब्रिस्टलला जात असताना हे घडलं. खेळाडू सहसा चाहत्यांना ऑटोग्राफ देताना किंवा त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसतात, पण यावेळी मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या. व्हिडिओवरून असे दिसते की, दोघांमध्ये खेळकर संवाद झाला. टीम इंडिया बसमध्ये जाण्यासाठी निघाली असताना चाहत्यांनी घेराव घातला. वैभव सूर्यवंशी चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. तितक्यात तिथे श्रेयसची एन्ट्री झाली आणि एका तरुणीने श्रेयसबद्दल जे बोलले ते ऐकून आता सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, तरुणीने श्रेयससोबत पुन्हा फोटो काढण्याचा हट्ट केला पण सॉरी म्हणत श्रेयस पुढं निघून गेला. मी ओळखते तुला, असं म्हणत तरुणने पुन्हा हट्ट केला. पण श्रेयसने काही मागे वळून बघेना. मी तुला ओळखते, तू मला लाईक करतो, असं म्हणत तरुणीने श्रेयसला बोलण्याचा प्रयत्न केला पण श्रेयस सरळ निघून गेला. हे ऐकून वैभवला आश्चर्य वाटले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या दौऱ्यावर अद्याप विजय मिळवता आलेला नाही. भारताला सर्वप्रथम आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही भारतीय संघ 0-2 ने मागे आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा