Virat Kohli: प्रॅक्टिस सेशन सुरु असताना विराट आणि गिलच का वाजलं? कोहली थेट अंगावर धावून गेला, Video Viral

Virat Kohli Fight Video: विराट कोहलीचा सरावातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो प्रचंड भडकलेला दिसत आहे.

Virat Kohli: प्रॅक्टिस सेशन सुरु असताना विराट आणि गिलच का वाजलं? कोहली थेट अंगावर धावून गेला, Video Viral
| Updated on: Sep 26, 2026 | 8:14 AM

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल, ज्यासाठी भारतीय संघ गुरुवारपासून येथे सराव करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये कोहली एका स्टाफ मेंबरसोबत वाद घालताना दिसत आहे. त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो शुभमन गिलवर भडकलेला पाहायला मिळाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, विराट कोहली क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान रोहित शर्मा, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल यांच्यासोबत उभा आहे. यावेळी तो भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफकडे जाऊन त्यांना काहीतरी सांगतो. एक स्टाफ मेंबर त्याच्याकडे बोर्ड घेऊन येतो आणि कोहली त्याकडे बोट दाखवून त्यांच्याशी वाद घालतो. असे दिसते की, क्षेत्ररक्षणादरम्यान बोर्डवर स्कोअर लिहून एक टास्क देण्यात आला आहे आणि कोहली त्याबद्दल बोलत आहे. शुभमन गिलही तिथेच होता त्यामुळे असं वाटतं होतो की तो त्यांच्यावर भडकला आहे. विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असो किंवा फलंदाजी, तो त्यात पूर्णपणे रमून जातो. मात्र, ही चर्चा गंभीर नव्हती; तो गंमत करत होता. पण तो आक्रमक दिसत असल्यामुळे असं वाटतं होते की भांडण सुरु आहे. चाहत्यांना उत्साह भलताच असणार आहे कारण विराट कोहली आणि रोहित शर्माला बऱ्याच काळानंतर आता खेळताना पाहायला मिळणार आहे.

शुभमन गिल जखमी
शुक्रवारी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलला सिराजचा चेंडू लागला. कोपराला चेंडू लागल्याने त्याने सराव थांबवला. आता तो खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल.

भारतीय एकदिवसीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, आकिब नबी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, नमन धीर.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us