..म्हणून क्रिकेटमधून संन्यास घेतोय : मुनाफ पटेल

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुनाफ पटेल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली. फिटनेस साथ देत नसल्याने मुनाफ गेल्या सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मुनाफने शेवटचा सामना 2011 सालच्या विश्वचषकात खेळला होता. मुनाफ नेमका काय म्हणाला? “मी आता 35 वर्षाचा झालो आहे. […]

..म्हणून क्रिकेटमधून संन्यास घेतोय : मुनाफ पटेल
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुनाफ पटेल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली. फिटनेस साथ देत नसल्याने मुनाफ गेल्या सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मुनाफने शेवटचा सामना 2011 सालच्या विश्वचषकात खेळला होता.

मुनाफ नेमका काय म्हणाला?

“मी आता 35 वर्षाचा झालो आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी मी संन्यास घेण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच मला अभिमान आहे की, 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होतो.” असं स्पष्टीकरण मुनाफ पटेलने दिलं आहे.

क्रिकेटमधील पदार्पण

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे 2006 मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात मोहाली येथे भारताच्या कसोटी संघात मुनाफला स्थान देण्यात आलं. या सामन्यात मुनाफने शानदार कामगिरी करत सात बळी टिपले होते. त्याच वर्षी इंग्लंड विरुद्धच्या वन डे सामन्यात मुनाफने पदार्पण केलं. तर 2011 साली मुनाफ टी-20 मध्ये पहिला सामना खेळला.

मुनाफची कामगिरी

मुनाफने भारताकडून खेळताना 13 टेस्ट, 70 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये मुनाफने 3.04 च्या इकोनॉमी रेटनं 35 विकेट घेतल्या. तर वनडेमध्ये 4.95 च्या इकोनॉमी रेटनं एकूण 86 विकेट काढल्या आहेत.

तसेच, टी-20 या छोट्या सामन्याच्या सामन्यामध्ये मुनाफला अधिक संधी न मिळाल्याने केवळ तीन सामन्यात चार बळी घेता आले आहेत. 2011 साली झालेल्या विश्वचषकात मुनाफने 11 विकेट घेतल्या होत्या.