Live क्रिकेटचा सामना थांबवावा लागला, अंधार पसरला अन् नंतर फॅन्सला दिसलं ते सूर्यग्रहण, Video Viral

सामना सुरु असताना चाहत्यांचे संपूर्ण लक्ष हे समोर खेळणाऱ्या खेळाडूकंडे असते. पण सामन्यात अशा काही गोष्टी घडत्यात ज्यामुळे चाहत्यांचे संपूर्ण लक्षवेधले जाते. आता जर क्रिकेट सामन्यादरम्यान सूर्यग्रहण सुरू झाले असं कधी ऐकलं आहे का? पण असेच पाहायला मिळाले. असेच काहीसे बुधवारी रात्री उशिरा, भारतीय प्रमाण वेळेनुसार घडले. या दिवशी सूर्यग्रहण झाले.

Live क्रिकेटचा सामना थांबवावा लागला, अंधार पसरला अन् नंतर फॅन्सला दिसलं ते सूर्यग्रहण, Video Viral
| Updated on: Aug 13, 2026 | 12:00 PM

सामना सुरु असताना चाहत्यांचे संपूर्ण लक्ष हे समोर खेळणाऱ्या खेळाडूकंडे असते. पण सामन्यात अशा काही गोष्टी घडत्यात ज्यामुळे चाहत्यांचे संपूर्ण लक्षवेधले जाते. आता जर क्रिकेट सामन्यादरम्यान सूर्यग्रहण सुरू झाले असं कधी ऐकलं आहे का? पण असेच पाहायला मिळाले. असेच काहीसे बुधवारी रात्री उशिरा, भारतीय प्रमाण वेळेनुसार घडले. या दिवशी सूर्यग्रहण झाले. जरी ते भारतात दिसले नसले तरी, जगभरातील अनेक भागांतील लोकांनी ते पाहिले. स्काय स्पोर्ट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

‘द हंड्रेड’चे सामने सध्या सुरू आहेत. बुधवारी, बर्मिंगहॅम फिनिक्स आणि एमआय लंडन यांच्यात सामना खेळला जात होता. या 100 चेंडूंच्या सामन्यात, पहिल्या डावात 60 चेंडू खेळले जात असताना, आकाशात अचानक एक अनोखे दृश्य दिसले. काही क्षणांपूर्वी सूर्य पूर्ण तेजस्वी होता, पण त्याचा आकार हळूहळू कमी झाला. थोड्या वेळाने, तो अर्धवट फुटलेल्या चंद्रासारखा दिसू लागला. सूर्यग्रहण सुरू होताच, सामना काही काळासाठी थांबवण्यात आला आणि स्टेडियममधील प्रत्येकाने ते पाहण्यासाठी चष्मे घातले. सामना फार काळ थांबला नाही; तो सुरूच राहिला. यानंतरही, सूर्यग्रहण संपेपर्यंत लोक पाहतच राहिले. त्यांचे लक्ष सामन्यावर नव्हते.

‘द हंड्रेड’च्या या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना एमआय लंडनने 157 धावा केल्या. जेव्हा बर्मिंगहॅम फिनिक्सने फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा तो संघ 7 गडी गमावून केवळ 155 धावाच करू शकला. अशाप्रकारे, एमआय लंडनने दोन धावांनी सामना जिंकला. सामना स्वतःच एक महत्त्वाचा होता, परंतु सामन्यादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय सूर्यग्रहण हा होता.

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण संपले आहे. हे सूर्यग्रहण कर्क राशीतील आश्लेषा नक्षत्रात झाले. भारतीय प्रमाण वेळेनुसार, हे सूर्यग्रहण रात्री 9:04 ते पहाटे 1:27 पर्यंत होते. हे एक खग्रास सूर्यग्रहण होते, ज्यामध्ये सूर्याचा सुमारे 90 टक्के भाग चंद्रामागे झाकला गेला होता. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातून दिसले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us