
टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली. विशेष बाब म्हणजे भारताने थेट विजयानेच टी-20 विश्वचषकाची सुरूवात केली. भारत विश्वचषकावर आपले नाव कोरेल असे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही दिवसांपासून धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. अनेक रेकॉर्ड भारताने आपल्या नावावर नोंदवली. भारताने पहिला सामना जिंकला असला तरीही अमेरिकेच्याविरोधात सामन्याबद्दल टीम इंडियाला एक मोठा इशारा देण्यात आला. सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाला हा इशारा दिला आहे. कारण हा पहिला विजय असला तरीही पुढे स्पर्धा अधिक मजबूत असेल. मजबूत संघ या विश्वचषकात मैदानात उतरली आहेत आणि त्यांच्यासोबत सामने बाकी आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषकात भारतासोबत खेळण्यास नकार दिला. मात्र, भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार की नाही याबाबत अजून काही माहिती मिळू शकली नाहीये.
सुनील गावस्कर यांनी भारताच्या विजयानंतर बोलताना म्हटले की, भारताची फलंदाजी मोठी आहे. मात्र, पॉवरप्लेमध्ये निष्काळजी राहणे हा देखील त्याचा अर्थ अजिबात होत नाही. मुळात म्हणजे 160 धावा करणे सोपे नव्हते. पण शेवटी 30 धावांनी जिंकणे चांगले असते. मुळात म्हणजे या विजयाने बरेच काही नक्कीच सांगितले आहे.
पुढे सुनील गावस्कर यांनी म्हटले की, जर तुमच्याकडे 9, 10, 11 व्या क्रमांकावर आठ फलंदाज आणि गोलंदाज असतील त्यापैकी जर आठ फलंदाजांपैकी चार फलंदाज 7-8 पटकांत बाद झाले तर संघ संकटात सापडेल. विशेष करून मजबूत आणि अनुभवी संघाविरोधात.
पॉवरप्ले सहा षटकांचा असतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यात चार विकेट गमावाल. पॉवरप्लेमध्ये जाणाऱ्या विकेटच्या मुद्यावरून गावस्करांनी कान टोचले. त्यांनी पुढे म्हटले की, विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रत्येक संघ आपले सर्वोत्तम प्रदर्शन करतो, कारण अशा संधी वारंवार येत नाहीत. सुनील गावस्कर यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ भारतीय संघाचा पावरप्लेमध्ये कामगिरीशी संबंध होता. पावरप्लेमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन अजिबातच चांगले राहिले नाही, त्यावर बोलताना सुनील गावस्कर दिसले.