Sunil Gavaskar: कुछ तो गडबड है…एकत्र 13 खेळाडू जखमी असं कसं? सुनील गावस्करांनी केली पोलखोल

भारतीय संघातील खेळाडू वारंवार दुखापतींचा सामना करत आहे, आता ही दुखापत का होत आहे यावर माजी दिग्ग्ज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले आहेट.

Sunil Gavaskar: कुछ तो गडबड है...एकत्र 13 खेळाडू जखमी असं कसं? सुनील गावस्करांनी केली पोलखोल
| Updated on: Aug 17, 2026 | 1:58 PM

IND vs SL Test Series: जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्यापर्यंत, साई सुदर्शनपासून हर्षित राणापर्यंत, भारतीय संघाच्या खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे गेल्या काही आठवड्यांत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बुमराह आणि हर्षितसारख्या खेळाडूंना मैदानावर परतल्यानंतर लगेचच दुखापती झाल्यामुळे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सवर (CoE) सुद्धा दबाव वाढला आहे. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत दुखापत झालेल्या खेळाडूमुंळे अनेक नवीन खेळाडूंना संधी ही मिळाली आहे. पण एक बाब जी चिंताजनक ठरते ती म्हणजे भारतीय संघाचे खेळाडू हे सतत दुखापतींचा सामना करत आहेत.

महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी CoE चा बचाव करत म्हटले की, “दोष खेळाडूंच्या प्रशिक्षण पद्धतीत असू शकतो. गावस्कर जिम-फिट असण्यापेक्षा मॅच-फिट असणे अधिक महत्त्वाचे आहे. बुमराहला गुडघ्याची दुखापत आहे, पण असे दिसून आले आहे की बहुतेक भारतीय खेळाडूंना हॅमस्ट्रिंगच्या दुखापती होतात. स्पष्टपणे, त्यांच्या प्रशिक्षणात काहीतरी चूक आहे आणि म्हणूनच त्यांना वारंवार हॅमस्ट्रिंगच्या दुखापती होत आहेत. या दुखापती त्यांना भारतासाठी खेळत असताना होतात, पण दुर्दैवाने, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथील फिजिओंवर दोष टाकला जातो.”

खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी खेळाडू ज्या तयारीच्या पद्धतींमधून जातात, त्यावर गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तथाकथित बायोमेकॅनिक्स, जे गोलंदाजाला सराव नेटमध्ये फक्त काही चेंडू टाकण्याची परवानगी देते, ही एक शंकास्पद पद्धत आहे. आयपीएलमध्येही असे समोर आले आहे की, काही परदेशी फिजिओ गोलंदाजांना नेटमध्ये 20 पेक्षा जास्त चेंडू टाकू देत नाहीत. जर तुम्हाला सामन्यात 24 चेंडू टाकायचे असतील—म्हणजे, जर तुम्ही नो-बॉल किंवा वाईड टाकत नसाल—तर नेटमध्ये कमी चेंडू टाकून काय फायदा?”

भारतीय संघाची कामगिरी ही मागील काही महिन्यात फारशी चांगली पाहायला मिळालेली नाही. आता यातच खेळाडूंना वारंवार दुखापत होत असल्याने भारतीय संघाची चिंता वाढत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us