अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक

| Updated on: Dec 23, 2020 | 8:14 AM

आपल्या संघाला विकेट मिळवून देण्यासाठी अर्जुन तेंडुलकरने बॉल हाती घेतला. परंतु सूर्यकुमारच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने अर्जुनच्या प्रत्येक बॉलवर हल्ला चढवला.

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक
Follow us on

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशने आयोजित केलेल्या प्रॅक्टिस मॅचच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज बॅट्समन सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav आपल्या बॅटिंगचा अप्रतिम नमुना सादर केला. केवळ 44 बॉलमध्ये त्याने धडाकेबाज शतक पूर्ण केलं. सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुनच्या (Arjun tendulkar) एकाच ओव्हरमध्ये त्याने 21 धावा फटकावल्या. (Suryakumar yadav Century Arjun tendulkar For 21 runs in A Single Over)

सूर्यकुमार यादव आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने आपल्या बॅटची जादू क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. आयपीएलनंतरही तो चांगलाच फॉर्मात आहे. प्रॅक्टिस मॅचच्या दुसऱ्या दिवशी त्याने 47 चेंडूंमध्ये नाबाद 120 धावा केल्या. त्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानच्या खेळीत त्याने अर्जुन तेंडुलकरच्या एकाच ओव्हरमध्ये 21 धावा काढल्या.

आपल्या संघाला विकेट मिळवून देण्यासाठी अर्जुन तेंडुलकरने बॉल हाती घेतला. परंतु सूर्यकुमारच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने अर्जुनच्या प्रत्येक बॉलवर हल्ला चढवला. अर्जुनच्या पहिल्याच बॉलवर त्याने गगनचुंबी षटकार लगावला. दुसऱ्या बॉलवर सणसणीत चौकार मारला. तिसऱ्या बॉलवर 2 रन्स काढून चौथ्या आणि पाचव्या बॉलवर त्याने पुन्हा सीमारेषेपार बॉल धाडले. सहाव्या चेंडूवर 1 धाव घेत अर्जुनच्या एका ओव्हरमध्ये त्याने 21 धावा फटकावल्या.

सूर्यकुमार यादवने पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये 31 बॉलमध्ये तुफानी 59 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 47 बॉलमध्ये 120 धावांची खेळी केलीय. टीम बी विरुद्ध टीम डी यांच्यादरम्यानच्या सामन्यात सूर्यकुमार अर्जुनवर तुटून पडला. आयपीएलनंतरचा फॉर्म सूर्यकुमारने टिकवून ठेवला आहे. आयपीेलमध्येही त्याने आपल्या खेळीत सातत्य टिकवून ठेवलं.

सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी टूर्नामेंटला येत्या 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने सगळ्या राज्यांच्या संभावित संघांना घेऊन अभ्यास मॅचचे आयोजन केले आहे. या प्रॅक्टिस मॅच संपल्यानंतर सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी टूर्नामेंटसाठी मुंबईचा संघ जाहीर केला जाणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये अर्जून तेंडुलकरनेही आपल्या बोलिंगचा जलवा दाखवला आहे. पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये अर्जुनने 4 ओव्हरमध्ये 22 रन्स देऊन 2 विकेट्स काढल्या. तर दुसऱ्या दिवशी 4 ओव्हरमध्ये 33 रन्स देऊन त्याने एक विकेट्स मिळवली. परंतु दुसऱ्या दिवशी अर्जुनच्या बोलिंगवर सूर्यकुमार तुटून पडला.

(Suryakumar yadav Century Arjun tendulkar For 21 runs in A Single Over)

संबंधित बातम्या

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात, धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात

मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेबाबत सुरेश रैनाने मौन सोडलं, म्हणाला…

Australia vs India | बॉक्सिंग डे कसोटीसाठी रिषभ पंत सज्ज