भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात, धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चलह विवाहबंधनात अडकला आहे. कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्मासोबत त्याचे लग्न त्याने लग्न केले आहे. (yuzvendra chahal dhanashree sharma)

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात, धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात

नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्मासोबत त्याने लग्न केले आहे. चहलने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी दिलीय. दरम्यान, या गोड बातमीमुळे त्याच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. (yuzvendra chahal married with youtuber dhanashree sharma)

फिरकीपटू युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी त्याची मैत्रीण धनश्री वर्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याचा सोहळाही पार पडला होता. चहलची जोडीदार धनश्री वर्मा मुंबईची रहिवासी आहे. चहल आणि धनश्री मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच अपलोड करत आले आहेत. या दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून लाखोंनी लाईक्स मिळतात. त्यानंतर आता युजवेंद्र आणि धनश्री लग्नबंधनात अडकले आहेत. युजवेंद्रच्या भावी सहजीवनासाठी त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात होता. मात्र, कसोटी मालिकेपूर्वी तो भारतात परतला होता. ऑस्ट्रेलियात भारताला ट्वेन्टी-20 मालिका जिंकवून देण्यात चहलचे महत्त्वाचे योगदान होते.

कोण आहे चहलची होणारी बायको धनश्री वर्मा

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्यांचे लग्न झाले.

संबंधित बातम्या :

‘आपदा को अवसर में बदल डाला’, युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

PHOTO | मावळता सूर्य, समुद्रकिनारा आणि ‘ती’, क्रिकेटपटू चहलचा रोमँटिक अंदाज

युजवेंद्र चहलकडून प्रेयसीसोबत गोड सेल्फी शेअर, धनश्री वर्माचा खास अंदाजात रिप्लाय

(yuzvendra chahal married with youtuber dhanashree sharma)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI