'आपदा को अवसर में बदल डाला', युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगला सुरुवात केली आहे (Yuzvendra Chahal Engagement).

'आपदा को अवसर में बदल डाला', युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगला सुरुवात केली आहे (Yuzvendra Chahal Engagement). युजवेंद्र चहलचा नुकताच त्याची मैत्रीण धनश्री वर्माशी साखरपुडा झाला. त्याने स्वतः याबाबतची माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे यात माजी क्रिकेटपटू विरेंदर सेहवागपासून अनेकांनी त्याला भन्नाट शुभेच्छा दिल्या.

चहलची जोडीदार धनश्री वर्मा मुंबईची रहिवासी आहे. चहल आणि धनश्री मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर त्यांनी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखरपुड्याचा निर्णय घेतला. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याविषयीची माहिती दिली.


युजवेंद्र चहलच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे ट्विटरवर चहलचे चाहते प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक मजेदार मीमचाही उपयोग करत आहेत.

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने पंतप्रधान नरेंद्र मोदींच फोटो शेअर करत अनोख्या अंदाजात चहलला शुभेच्छा दिल्या. सेहवाग म्हणाला, ‘चहल, संकटालाही संधीत रुपांतरीत केलंस. अभिनंदन.’


सचिन तेंडुलकरने चहलला शुभेच्छा देताना म्हटलं, “चहल आणि धनश्री दोघांनाही शुभेच्छा. नव्या इंनिंगसाठी दोघांना शुभेच्छा.” माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने चहलच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या.


युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवला आहे. त्यानंतरच त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला आहे.


धनश्री वर्मा एक यूट्यूबर आहे आणि तिचा डान्सशी संबंधित यूट्यूब चॅनल (धनश्री वर्मा यूट्यूब चॅनल) आहे. त्याचे 15 लाखाहून अधिक सब्सक्रायबर आहेत. धनश्री बॉलीवूड गाण्यांवर व्हिडीओ तयार करते. या व्यतिरिक्त ती हिप-हॉपचे प्रशिक्षण देखील देते. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती आपल्या डान्स अॅकेडमीचे व्हिडीओ देखील शेअर करते.

आयपीएलची टीम चेन्नई सुपर किंग्सने चहलला शुभेच्छा देताना म्हटलं, ‘दोघांनाही शुभेच्छा. किंग्सकडून युजीला व्यक्तिगत सल्ला : नेहमी क्विनसमोर (राणी) वाकून राहा, नाही तर नक्कीच पराभव होईल.’

हेही वाचा :

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Kainat Imtiaz | विराटवर फिदा पाकिस्तानच्या सौंदर्यवती क्रिकेटपटूचा साखरपुडा

AB de Villiers | एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार

Yuzvendra Chahal Engagement

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *